महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेल महापालिकेच्या 15 नगरसेवकांचे निलंबन - Suspension of 15 corporators of Panvel Municipal Corporation

मालमत्ता कर आकारणीसाठी पनवेल महापालिकेची विशेष ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाजपचे नगरसेवक मत मांडू देत नसल्याचा आरोप करत शेकाप आणि महाविकास आघाडीचे नगरसेवक थेट सभागृहात दाखल झाले आणि सभा सुरू करण्याची विनंती केली.

पनवेल महापालिकेच्या 15 नगरसेवकांचे निलंबन
पनवेल महापालिकेच्या 15 नगरसेवकांचे निलंबन

By

Published : Apr 6, 2021, 8:57 AM IST

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपाची विशेष सभा ऑनलाईन आयोजित केलेली असतानाही सभागृहात दाखल झालेल्या 15 नगरसेवकांवर महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यात शेकाप आणि महाविकास आघाडीच्या 14 तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

थेट सभागृहात दाखल झाल्याने कारवाई

मालमत्ता कर आकारणीसाठी पनवेल महापालिकेची विशेष ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाजपचे नगरसेवक मत मांडू देत नसल्याचा आरोप करत शेकाप आणि महाविकास आघाडीचे नगरसेवक थेट सभागृहात दाखल झाले आणि सभा सुरू करण्याची विनंती केली. यावेळी महापौरांनी या नगरसेवकांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र विरोधी नगरसेवक त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. यानंतर सभागृहात पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी नगरसेवकांची समजूत काढत त्यांना सभागृहाबाहेर काढले.

या १५ नगरसेवकांचे निलंबन
ऑफलाईन सभेत हजर राहण्याची परवानगी नसताना हजर राहून गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका लीना गरड, शेकापचे नगरसेवक गणेश कडू, शंकर म्हात्रे, गोपाळ भगत, रवींद्र भगत, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय खानावकर, विष्णू जोशी, डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज म्हात्रे, प्रिया भोईर, उज्वला पाटील, प्रज्योती म्हात्रे, कमल कदम, सारिका भगत आदी नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले.

हेही वाचा -कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details