महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय; पतीचा शेजाऱ्यावर कोयत्याने हल्ला - husband attack on neigbour thane latest news

राजपुरोहित हा तुळशीधाम, धर्मवीरनगर येथे एकटाच वास्तव्य करतो. त्याचे कुटुंबीय मूळगावी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात आहे. शिवाजी कुरणे यांची पत्नी राजपुरोहित यांच्या घरी घरकाम आणि स्वयंपाकासाठी येत होती. यावरून शिवाजी हा आपल्या पत्नीवर संशय घेत असे.

chitalsar police station (file photo)
चितळसर पोलीस ठाणे (संग्रहित)

By

Published : Feb 13, 2020, 8:09 AM IST

ठाणे -पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून पतीने शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास वसंतविहार परिसरात घडली. भरतसिंग राजपुरोहित (वय - 35, रा. धर्मवीरनगर), असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर हल्लेखोर पती शिवाजी कुरणे (वय - 48, रा.धर्मवीरनगर) याला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा -पुण्यात एटीएम फोडले, १२ लाखांच्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

राजपुरोहित हा तुळशीधाम, धर्मवीरनगर येथे एकटाच वास्तव्य करतो. त्याचे कुटुंबीय मूळगावी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात आहे. शिवाजी कुरणे यांची पत्नी राजपुरोहित यांच्या घरी घरकाम आणि स्वयंपाकासाठी येत होती. यावरून शिवाजी हा आपल्या पत्नीवर संशय घेत असे. याबबाबत राजपुरोहित यांना मंगळवारी सकाळी फोनवरून धमकावले होते. यानंतर बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राजपुरोहित मुंबईला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभा होता. तेव्हा, अचानक पाठीमागून कोयत्याने राजपुरोहितवर जीवघेणा हल्ला केला. असा जबाब राजपुरोहित याने पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details