महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : ग्रामीण भागात १ लाख २ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण - ठाण्यात कोरोना सर्व्हेक्षण

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३७१ आहे. त्यापैकी २२३ जण बरे होऊन स्वगृही परतले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Thane Corona News
ठाणे कोरोना बातमी

By

Published : Jun 2, 2020, 8:05 PM IST

ठाणे - ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्या ठिकाणाचा परिसर कंटेंटमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केला जातो. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सद्यस्थितीत ७५ एवढे प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या क्षेत्रातील आतापर्यंत १ लाख २ हजार २८९ घरांचे आरोग्य विभागा मार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात सतत १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येते. व परिसरातील नागरीकांना काही लक्षणे आहेत का ? याची माहिती घेण्यात येते. यासाठी आताच्या घडीला १००९ सर्वेक्षण पथकांनी सर्वेक्षणाचे काम केले आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३७१ आहे. त्यापैकी २२३ जण बरे होऊन स्वगृही परतले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे काम प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय केले जात आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी आणि विविध सवर्गाचे कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी तालुक्यात कार्यरत आहेत. आताच्या घडीला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी आरोग्याच्या कर्मचाऱ्यांसह, महिला व बाल विकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, शिक्षण विभागाचे शिक्षक सर्वेक्षण कामासाठी कार्यरत आहेत.

क्वारंटाईन सेंटर आणि कोरोना केअर सेंटर

सध्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी टाटा आमंत्रा कल्याण बायपास, बीएसयुपी सोनिवली बदलापूर, सिद्धार्थ कॉलनी ( खडवली ), कुडवली ( मुरबाड ), जोंधळे कॉलेज ( आसनगाव ), शेटे कॉलेज ( कसारा ), दहागांव आश्रम शाळा ( वासिंद ) आदि ठिकाणी क्वारंटाईन सेंटर आहेत. तर भिनार आश्रमशाळा, जोंधळे कॉलेज, बीएसयुपी सोनिवली, एनटीई इंजिनियरिंग कॉलेज आदी ठिकाणी कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आलेले आहेत. सध्याच्या घडीला घरी अलगीकरण केलेले ८३० लोक असून अलगीकरण कक्षात भरती केलेले ३३५ लोक आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details