महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समाजच म्हणतोय वंचित आघाडी भाजपची बी टीम; बसप प्रदेशाध्यक्षाची टीका - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बहुजन समाज पार्टीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती डोंबिवली येथील ठाकूर हॉलमध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष साखरे बोलत होते.

समाजच म्हणतो वंचित आघाडी भाजपची बी टीम

By

Published : Jul 31, 2019, 8:37 PM IST

ठाणे- वंचित बहुजन आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीपासून एकला चलो रे ची भूमिका घेत आहे. त्यांनी एकदाही बसपाला चर्चेची संधी दिली नाही. प्रकाश आंबेडकरांना आंबेडकरी विचारसरणीच्या मतांचे विभाजन करायचे नसेल, तर त्यांनी मोठ्या भावाची भूमिका घ्यावी व बसपसोबत युती करावी. हे जर युतीची भूमिका घेत नसतील तर समाज म्हणतो त्याप्रमाणे वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याची टीका बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे येणे डोंबिवली बोलताना केली.

बहुजन समाज पार्टीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती डोंबिवली येथील ठाकूर हॉलमध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष साखरे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर बसपचे महाराष्ट्र प्रभारी राम अचल राजभर, प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे, दयानंद किरतकर, ठाणे प्रभारी आलम भाई शेख, ठाणे जिल्हा अध्यक्ष शोभा इंगळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना साखरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण, ते आमच्या नेत्यांच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीपासून ते एकटे चालण्याची भूमिका घेत आहे. आम्हाला त्यांनी चर्चेला एकदाही संधी दिली नाही. मायावती प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असतील तर आम्ही चर्चा करू. आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेडकर विचारसरणीच्या मतांचे विभाजन टाळायचे असेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादी व आंबेडकर विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र युती करायला हवी, असे मत साखरे यांनी मांडले.

प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. आंबेडकर विचारसरणीच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी त्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेऊन युती करावी. ते तर युतीची भूमिका घेत नसतील तर समाज म्हणतो त्याप्रमाणे वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याची टीका साखरे यांनी केली.

महाराष्ट्राचे प्रभारी राम अचल राजभर यांनी बसपच्या आगामी वाटचालीबाबत माहिती दिली. बसप महाराष्ट्रात सर्व जागा लढवणार असून सर्व जिल्ह्यात संघटना बांधणीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचे कार्य सुरू असून त्यामुळे बसप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निर्विवाद यश संपादन करेल, असा विश्वास राजभर यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details