ठाणे -जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे बडेनेते माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आज (दि. 29 मे) शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
दोन वर्षापासून मामाकडे पक्षश्रेष्ठींनी केले दुर्लक्ष
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करत तब्बल दोन वर्षे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती. शिवसेनेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर आपले वैयक्तीक कारण पुढे करत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना म सदस्यपदासहा आपला जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.