महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टोलमुक्तीसाठी सुप्रिया सुळे उतरणार रस्त्यावर - supriya sule

निवडणुकीच्या आधी सेना-भाजपने ठाणेकरांना टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले नाही. त्यामुळे टोलमुक्तीसाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. संवाद यात्रे निमित्त त्या ठाण्यात आल्या होत्या.

टोलमुक्तीसाठी सुप्रिया सुळे उतरणार रस्त्यावर

By

Published : Aug 30, 2019, 4:56 AM IST

ठाणे-निवडणुकीच्या आधी सेना-भाजपने ठाणेकरांना टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, ते त्यांनी पाळले नाही. त्यामुळे टोलमुक्तीसाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. संवाद यात्रे निमित्त त्या ठाण्यात आल्या होत्या.

टोलमुक्तीसाठी सुप्रिया सुळे उतरणार रस्त्यावर

सुप्रिया सुळे यांची सध्या राज्यभर संवाद यात्रा सुरु आहे. त्या निमित्त त्या गुरुवारी ठाण्यात आल्या होत्या. सकाळी त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीने आपल्याला ६ किमी अंतर कापण्यासाठी सुमारे दीड तासांचा अवधी लागत असल्याचे सुळे यांना सांगितले. तसेच, टोलमुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे एका प्राध्यापकाने सांगितले. त्याचा दाखला देत ठाणे टोलमुक्त करण्यासाठी आपण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, सय्यद अली अश्रफ, प्रदेश चिटणीस सुहास देसाई, ज्येष्ठ नगरसेवक मुकूंद केणी, शानू पठाण हे यावेळी उपस्थित होते.

संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण राज्यभर दौरे करुन आघाडी सरकारच्या काळात केलेल्या लोकहितांच्या कामांची स्थिती जाणून घेत आहोत. लोकांच्या मनात सध्या काय चालले आहे, याचा अंदाज घेत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. हे सरकार अत्यंत संवेदनाहीन आहे. मुंबईत बलात्कार झालेल्या एका तरुणीचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. विशेष म्हणजे, सदर तरुणी जालना येथील आहे. आज मुख्यमंत्री तेथे असतानाही या प्रकरणाची साधी वाच्यताही ते करत नसतील तर ते किती असंवेदनशील आहे, हेच या निमित्ताने उघड झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी चेंबूरच्या लाल डोंगर येथून मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

केवळ सत्ताधाऱ्यांच्या धमक्यांना घाबरुन आज जे नेते पक्षांतर करीत आहेत. त्यांना मोठे कोणी केले? पक्षामुळेच ही लोकं मोठी झाली आहेत. शरद पवारांनी संघर्षातूनच पक्ष बांधला आहे. त्यामुळे 40 वर्षे सोबत असलेले लोक जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा दु:ख होणारच. या सरकारच्या काळात देश हुकूमशाहीकडे जात असल्याचं चित्र आहे, असा आरोप सुळे यांनी केला आहे.

देशात सध्या मंदीचे वातावरण आहे. औद्योगिक वसहाती बंद करुन त्या जागा बिल्डरला देण्याचे धोरण या सरकारचे आहे. वागळे नावाच्या माणसाने शरद पवार यांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीसाठी जागा दिली होती. आता हीच जागा बिल्डरांना देण्याचा घाट घातल्या दात असल्याचा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details