ठाणे - भाजपचे संकल्पपत्र म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली. महाराष्ट्रात आम्हाला विरोधकच नाहीत असे मुख्यमंत्री सांगत आहेत. मग दिल्लीवरुन मॉनिटर कशाला बोलावले, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
भाजपचे संकल्पपत्र म्हणजे गाजरांचा पाऊस - सुप्रिया सुळे हेही वाचा - राज्याची स्वतःची पीक विमा कंपनी काढणार - उद्धव ठाकरे
हेही वाचा - मोदी हे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल
राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपच्या संकल्पपत्राची खिल्ली उडवली. भाजपने संकल्पपत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे नमूद केले. मात्र, प्रत्यक्षात आपण ही मागणी गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोकसभेत करत असल्याचे सुळेंनी सांगितले. विशेष म्हणजे त्यावेळीही भाजपचे सरकार होते. मग निवडणुका आल्यावरच भाजपवाल्यांना भारतरत्न का आठवला? असा खोचक सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.