ठाणे : भिवंडी - निजामपूर महापालिकेतील उद्यान विभागात कर्तव्यावर असलेल्या उद्यान अधीक्षकांचे मनपाचे मुख्यालय उपायुक्त डॉ दीपक सावंत यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर करून हिरवा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निलेश संखे असे निलंबित केलेल्या उद्यान अधीक्षकांचे नाव आहे.
भिवंडी महापालिकेत 'हिरवा' भ्रष्टाचार करणारा उद्यान अधीक्षक निलंबित - उद्यान अधीक्षक निलंबित
भिवंडी - निजमपूर महापालिकेतील उद्यान विभाग अधीक्षकांना निलंबित करण्यात आले. त्याच्यावर हिरवा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत ‘हिरवा’ भ्रष्टाचार -
निलेश संख्ये यांनी उद्यान विभागात उद्यान अधीक्षक या पदावर कार्यरत असतांना केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत भिवंडीतील महापालिका परिसरातील विविध उद्यानात उद्यान विभागामार्फत राबविण्यात आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे केंद्र शासनाच्या हरितपट्टा वनीकरण प्रकल्पामध्ये उद्यान विभागाने जाहीर केलेल्या अहवालातील कामांचा व प्रत्येक्ष झालेले काम यांमध्ये मोठी तफावत आढळली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसचे समाधानकारक उत्तर संखे यांनी दिले नसल्याने मुख्यालय उपायुक्त सावंत यांनी गुरुवारी त्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. उद्यान अधीक्षकांच्या निलंबनाच्या कारवाईने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली असून कर्तव्यात कसूर करणारे इतरही अधिकारी व कर्मचारी निलंबनाच्या वाटेवर असल्याने भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे .