ठाणे- सुलोचना देवी सिंघानिया शाळेतील 4 विद्यार्थ्यांनी आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यश भन्साळी हा 497 गुण मिळवून 99.40 टक्क्यांनी देशभरातून 2 रा आला, तर ओजस देशपांडे आणि आदित्य वाकचौरे हे 496 गुणांसह 99.20 टक्के मिळवून देशातून तिसऱ्या स्थानावर आले आहेत.
ठाण्यातील सिंघानिया शाळेतील विद्यार्थ्यांचे आयसीएसई परीक्षेत यश - आयसीएसई
यश भन्साळी हा 497 गुण मिळवून 99.40 टक्क्यांनी देशभरातून 2 रा आला, तर ओजस देशपांडे आणि आदित्य वाकचौरे हे 496 गुणांसह 99.20 टक्के मिळवून देशातून तिसऱ्या स्थानावर आले आहेत. त्यांनी यश मिळवल्याने या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थी
आयसीई म्हणजेच 12 वीला असलेला निमेश वाडेकर यालादेखील 99.50 टक्के मिळाल्याने तो देशात तिसरा आला. अवघड समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत ठाण्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याने त्यांचे कौतुक होत आहे. देशातून तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ओजसला पुढे डॉक्टर बनायचे आहे, तर निमेशला संगणक अभियंता बनायचे आहे. अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूर राहा आणि लक्ष देऊन अभ्यास करा, अशा टिप्स त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.