ठाणे -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे कट्टर मनसैनिक असलेल्या प्रविण चौगुले (वय 27) या तरुणाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. मात्र, प्रविणला दारूचे व्यसन होते. त्याने यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रविण मानसिकरित्या कमकुवत होता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
प्रविण चौगुलेचा मृत्यू निष्ठेपोटी की मानसिक तणावातून?
प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या जवळचा होता. राज ठाकरे यांना नोटीस आल्यापासून आपण तणावात असल्याची भावना त्याने आत्महत्या करण्यापूर्वी शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखांकडे व्यक्त केली होती. मंगळवारी दिवसभर त्याने त्याच्या फेसबुक वॉलवर राज ठाकरेंच्या समर्थनात आणि ईडीच्या विरोधात अपशब्द वापरुन पोस्ट लिहिल्या होत्या.
प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या जवळचा होता. राज ठाकरे यांना नोटीस आल्यापासून आपण तणावात असल्याची भावना त्याने आत्महत्या करण्यापूर्वी शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखांकडे व्यक्त केली होती. मंगळवारी दिवसभर त्याने त्याच्या फेसबुक वॉलवर राज ठाकरेंच्या समर्थनात आणि ईडीच्या विरोधात अपशब्द वापरुन पोस्ट लिहिल्या होत्या. प्रविणने फेसबुकवर ईडीच्या विरोधात पोस्ट टाकून आत्महत्या केल्याने मनसैनिक चांगलेच संतापले आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी "नेत्याच्या प्रेमापोटी जीव देणे हे सोपे नाही. फार कमी नेत्यांच्या भाग्यात असे कार्यकर्ते लाभतात. त्यामुळे प्रविण चौगुले आणि भाग्यवान नेते राज ठाकरे या दोघांनाही सलाम." अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, प्रविणने २०१५ मध्ये हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याने फाशी घेण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यातही त्याने अंगावर राॅकेल ओतुन पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या सर्व घटना पाहता आत्महत्येमागे 'राज ठाकरेंना आलेली ईडीची नोटीस' हे कारण वाटत नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रविण पवार यांनी दिली आहे. परंतु, घटनेची चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.