ठाणे -महाविकास आघाडीचे सरकार हे फसवा-फसवीचे सरकार आहे. आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांचीच फसवणूक केल्याची जोरदार टीका, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. भाजप नेते सीताराम राणे यांनी ठाण्यात भरवलेल्या मालवणी महोत्सवाला देशमुख यांनी भेट दिली.
निवडणुकीत मतदारांनी शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला होता. मात्र, शिवसेनेने विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची भरपाई देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने घूमजाव केले. सत्तेत येऊन दोन महिने उलटले तरी हे सरकार अजून अस्थिर असल्याची टीका देशमुख यांनी केली.