महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Police Sherlock Homes : ठाणे पोलीस दलातील 'शेरलॉक होम्स' उप निरीक्षक प्रवीण जाधव; हरविलेल्या वस्तू दिल्या परत मिळवून - वस्तू शोधून देण्याला प्रथम प्राधान्य

रिक्षात मागे राहिलेल्या बॅग किंवा इतर मौल्यवान वस्तू यावर अनेकदा पाणीच सोडावे लागते आणि त्याला कारणीभूत ठरतात ते वाहतूक अथवा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची उदासीन प्रवृत्ती; परंतु याच्या उलट एक अधिकारी मात्र या वस्तू शोधून देण्याला प्रथम प्राधान्य देत त्या वस्तू मूळ मालकांना परत करणे याला आपलं कर्तव्यच नव्हे तर आपली जबाबदारी समजतो. प्रवीण जाधव या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने मुंब्रातील एका व्यक्तीची बॅग अथक परिश्रम घेऊन शोधून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Thane Police Sherlock Homes
उप निरीक्षक प्रवीण जाधव

By

Published : Jun 29, 2023, 4:01 PM IST

Updated : Jun 29, 2023, 4:55 PM IST

उप निरीक्षक प्रवीण जाधव यांची प्रतिक्रिया

ठाणे:रिक्षाने प्रवास करताना आपण अनेकदा घाई गडबडीत उतरून जातो आणि मौल्यवान वस्तू कागदपत्र असलेले आपल्या बॅगा मागेच राहतात. मग या बॅगा मिळवण्यासाठी सुरू होते ती प्रयत्नांची आणि सहनशीलतेची पराकाष्ठा. पोलिसांकडे सतत हेलपाटे मारून अखेर थकलेले नागरिक आपल्याला या वस्तू परत कधीच मिळणार नाही असा समज करून घेतात आपल्या नशिबाला दोष देत बसतात. ठाणे वाहतूक शाखेत असा एक पोलीस अधिकारी आहे. ज्याने गहाळ झालेल्या वस्तूंचा शोध घेण्याला आपले ध्येय बनवले आहे. अशा ध्येयवेड्या अधिकाराचे नाव प्रवीण जाधव असून ते सध्या ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागात उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.


कॅमेऱ्याची बॅग रिक्षातच विसरले:प्रवीण जाधव यांना पोलीस दलातील 'शेरलॉक होम्स' म्हटले तर वावगं ठरू नये. इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांनी गहाळ झालेल्या वस्तूंचा माग काढत त्या वस्तू मालकांना परत केले आहेत. अशीच एक घटना मुंबई येथे घडली ज्यात मुंब्राचे रहिवासी कौसर शेख हे 2 जून रोजी कौसा येथून मुंब्रा रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी रिक्षात बसले. घाई गडबडीत रिक्षातून उतरून जाताना शेख यांची दीड लाख रुपये किमतीचे कॅमेरे असलेली बॅग रिक्षातच राहिली. शेख यांनी त्या रिक्षावाल्याला शोधण्याचा प्रयत्न केला खरा परत रिक्षा न सापडल्याने ते हतबल झाले व त्यांनी कोपरी वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्याशी संपर्क केला.

हरविलेला मुद्देमाल परत:प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत जाधव यांनी अथक परिश्रम घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने व ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संतोष समेळ यांच्या मदतीने सदर रिक्षा शोधून काढली. सदर रिक्षाचालकाने कॅमेरा बॅग रिक्षात राहिले नसल्याचे सांगितले खरे. परंतु प्रवीण जाधव यांनी पोलीस खाक्या दाखवताच त्याने सदर बॅग जाधव यांच्या स्वाधीन केली. त्यांच्या या अचाट कामगिरीचे कौतुक ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले. पोलीस विभाग उपायुक्त आणि कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या उपस्थितीत सदर कॅमेरा शेख यांना सुपूर्द करण्यात आला.

'शेरलॉक होम्स' नाव बहाल:या संदर्भात प्रवीण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आतापर्यंत केलेल्या आपल्या प्रचंड कामगिरीचा पाढाच वाचून दाखवला. प्रवीण जाधव यांनी आतापर्यंत मुजोर वाहनचालक आणि रिक्षाचालकांना 1 कोटी २० लाखांचा दंड ठोठावला असून 25 लाखांची दंड वसुली देखील केली आहे. याशिवाय त्यांनी अनेकांचे लॅपटॉप, सोन्याचे दागिने, रोकड, अति महत्त्वाची कागदपत्रे, चष्मे यासह चोरीस गेलेल्या दोन रिक्षा देखील शोधून दिल्याचे अभिमानाने सांगितले. अचाट कामगिरी करणारे ध्येयवेढ्या पोलीस अधिकाऱ्याला 'शेरलॉक होम्स' नाव हे नाव अत्यंत समर्पक आहे असेच म्हणावे लागेल.

Last Updated : Jun 29, 2023, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details