महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे 'मैदान बचाव' आंदोलन

हाजुरी येथील मुलांच्या हक्काच्या मैदानावर अनधिकृत बांधकाम होत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उर्दू शाळेतील मुलांनी मैदान बचाव आंदोलन सुरू केले आहे.

By

Published : Feb 4, 2020, 12:21 PM IST

Thane
मैदान बचाव आंदोलन

ठाणे- महानगरपालिकेच्या हाजूरी येथीलवागळेइस्टेट शाळा क्रमांक 32 आणि उर्दू शाळा क्रमांक 12 च्या मैदानावर बांधकाम सुरू आहे. त्याविरोधात आज (मंगळवारी) उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी 'मैदान बचाव' आंदोलन सुरू केले आहे. यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मैदानावरील बांधकाम त्वरित काढण्याचे आवाहन पालिकेला केले आहे.

उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे 'मैदान बचाव' आंदोलन

सध्या शहरात लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेही खुली मैदाने शिल्लक राहिलेले नाही. शाळेत असलेली मैदाने हीच मुलांची विरंगुळ्याची ठिकाणे आहेत. मात्र, झपाट्याने बदलणाऱ्या जगात, लहान मुले मोबाईलच्या आहारी जात असून त्यांना पुन्हा एकदा मैदानाकडे वळविले पाहिजे, असे सगळे बोलत असतानाच मैदानावर बांधकाम होत असताना मुलांनी खेळायचे कुठे? असा सवाल पालकांनी उपस्थित केला.

हाजूरी येथील मुलांच्या हक्काच्या मैदानावर अनधिकृत बांधकाम होत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आपले मैदान कोणालाही हिरावून घेऊ देणार नाही, ही भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. यावेळी ठाणे महानगरपालिका, शिक्षण विभाग आणि आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details