महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे : विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षण देण्याची विद्यार्थी भारती संघटनेची मागणी - free education for students news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांवर आर्थिक अडचणींचा ताण येऊन पडला आहे. यातच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी पैशाची जुळवाजुळव करणे पालकांकरता अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे, आताचे एक वर्ष विद्यार्थ्यांना मोफत शिकवणे शिक्षण संस्थांना कठीण गोष्ट नाही. त्यामुळे खासगी व व्यावसायिक अशा सर्वच अभ्यासक्रमांना मोफत शिक्षण द्यावे, अशी मागणी विद्यार्थी भारती संघटनेनी केली आहे.

विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षण देण्याची विद्यार्थी भारती संघटनेची मागणी
विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षण देण्याची विद्यार्थी भारती संघटनेची मागणी

By

Published : Jun 29, 2020, 5:29 PM IST

ठाणे - कोरोना महामारीच्या महाभयंकर काळात पालकांचा आर्थिक कणा मोडला आहे. शिक्षण काळाची गरज आहे मात्र, सद्याची परिस्थिती पाहता पालकांकडे पाल्यांची फी भरायला पैसे नाहीत. त्यामुळे यावर्षी खासगी, सरकारी, व्यावसायिकांसह सर्वच अभ्यासक्रमांनी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची मागणी विद्यार्थी भारतीने इमेलच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, कुलगुरु तसेच पंतप्रधान यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक जवळपास चार महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहेत. त्यामुळे पालकांना आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. घरात खायला-प्यायला अन्नधान्य नाही. तर, कुठे एक वेळच्या जेवणाची मारामारी आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षणासाठी पैशाची जुळवाजुळव करणे पालकांकरता अशक्य गोष्ट आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावे, असे वाटत असेल. तर, येणाऱ्या पुढील वर्षाच्या काळात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये. कोरोनाच्या या संकटात विद्यार्थ्यांना 100 वर्षातून आलेले अपवादात्मक वर्ष समजून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात मोफत शिक्षण द्यावे, असे विद्यार्थी भारतीच्या राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी म्हटले आहे.

शैक्षणिक संस्थांनी आतापर्यंत बराच पैसा कमावला आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे जगावर संकट कोसळले आहे. त्यामुळे, आताचे एक वर्ष विद्यार्थ्यांना मोफत शिकवण शिक्षण संस्थांना कठीण गोष्ट नाही. त्यामुळे खासगी व व्यावसायिक अशा सर्वच अभ्यासक्रमांना मोफत शिक्षण द्यावे, असे राज्य संघटक शुभम राऊत, कार्याध्यक्ष प्रणय घरत, राज्य कार्यवाह श्रेया निकाळजे यांनी या पत्रात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details