ठाणे - कोरोनाच्या संकटकाळात शाळा सुरू होणार की नाही? यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शाळा सुरू होणार. मात्र, त्या ऑनलाईन पद्धतीने, असा निर्णय झाला आहे. आता लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईलवर शिकायला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांसह विद्यार्थीही उत्सुक - ऑनलाई शिक्षण ठाणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा जून महिन्यामध्येच सुरू होतील. मात्र, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली. घोषणा होताच पालकांची लॅपटॉप, कॉम्प्युटर विकत घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तसेच यावर विशेष अॅप डॉऊनलोड करून ते कसे हाताळायचे, वेबकॅम कसा सुरू करायचा याबाबत पालक माहिती घेताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा जून महिन्यामध्येच सुरू होतील. मात्र, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली. घोषणा होताच पालकांची लॅपटॉप, कॉम्प्युटर विकत घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तसेच यावर विशेष अॅप डॉऊनलोड करून ते कसे हाताळायचे, वेबकॅम कसा सुरू करायचा याबाबत पालक माहिती घेताना दिसत आहेत. त्याबद्दल शाळेतील शिक्षकांनी देखील व्हॉट्सअॅपवरून माहिती दिली आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर देखील गणवेश आवश्यक असल्याच्या सूचना शाळांनी दिल्या आहेत. ही अभिनव संकल्पना राबविण्याची पहिलीच वेळ असल्याने पालक देखील उत्सुक आहेत. तसेच त्यांनी आपल्या पाल्यांना कॉम्प्युटरचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहेत. एकूणच भारतात प्राचीन गुरुकुल पद्धतीपासून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास कोरोनामुळे का होईना आज ऑनलाईन शिक्षणापर्यंत येऊन ठेपला आहे.