महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime News : धुळवडीचा रंग बेरंग; ठाण्यात तरुणाच्या डोक्यात टाकला दगड - ठाण्यात तरुणाच्या डोक्यात दगड मारला

ठाण्यात किरकोळ कारणातून एका तरुणाच्या डोक्यात दगड टाकत जीवघेणा हल्ला करण्यात ( Stone hit Young Man Head ) आला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत.

Thane Crime News
Thane Crime News

By

Published : Mar 19, 2022, 6:43 PM IST

ठाणे - धुळवडीच्या कार्यक्रमाला ठाण्यात गालगोट लागले आहे. किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु ( Stone hit Young Man Head ) आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Fir Register Vitthal wadi police station ) आहे.

मंगल गुप्ता ( वय 27, रा. उल्हासनगर कॅम्प ४, भीमनगर कॉलनी ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर संगीत भोईर, राजेश साळुंखे, यश कनोजिया आणि राज असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगल हा मित्रांसोबत ब्राम्हण पाडा येथे धुळवड कार्यक्रम सुरु असताना गेला होता. तेव्हा दोन गटात किरकोळ वाद निर्माण झाला. त्यातून चार जणांच्या टोळीने मंगल आणि त्याच्या दोन मित्रांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मंगलच्या डोक्यात दगड मारल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, विष्णू वैराठे आणि अवधूत साळवे हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी मंगलच्या तक्रारीवरुन चौघांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पांडव करत आहेत.

हेही वाचा -Abdul Sattar On Raosaheb Danve : 'उलटा चोर कोतवाल को डाँटे, अशी दानवेंची अवस्था'

ABOUT THE AUTHOR

...view details