ठाणे - उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातील तब्बल ६ दुकानांचे एका रात्रीत शटर तोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दुकाने फोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात तब्बल 6 दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; प्रकार सीसीटीव्हीत कैद - Ulhasnagar
उल्हासनगर शहरात गेल्या महिन्याभरापासून चोऱ्या व घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील केम नंबर 3 येथील रेल्वे स्थानक परिसरातील पीएमसी बँके समोर वासुदेव नागदेव यांचे पार इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान आहे. चोरट्याने दुकानाचे टाळे व शटर तोडून आत प्रवेश केला. या दुकानातील रोख रक्कम चोरून नेली.
उल्हासनगर शहरात गेल्या महिन्याभरापासून चोऱ्या व घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील केम नंबर 3 येथील रेल्वे स्थानक परिसरातील पीएमसी बँके समोर वासुदेव नागदेव यांचे पार इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान आहे. चोरट्याने दुकानाचे टाळे व शटर तोडून आत प्रवेश केला. या दुकानातील रोख रक्कम चोरून नेली. आजूबाजूचे शांतिनंद एंटरप्राइजेस, अजित चावला यांचे अगरबत्तीचे दुकान, जगदीश इंटरप्राईजेस व इतर दोन दुकानांची शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी काही दुकानातून रोख रक्कम लंपास केली. हा प्रकार सकाळी उघडकीस येताच व्यापारी वर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्यांच्या घटना सातत्याने घडत असून पोलिसांनी या चोरट्यांचा शोध तातडीने घ्यावा अशी मागणी व्यापारी वर्गांमध्ये केली जात आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास एपीआय वारे करत आहेत. सहा दुकाने फोडताना येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांची छबी टिपली गेली आहे. या फुटेजच्या आधारे चोरट्ंयाना शोधून काढण्याचे मध्यवर्ती पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.