महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्लास्टिक विरोधी कारवाई; एपीएमसी मार्केटमध्ये 2 हजार किलोहून अधिक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त - plastic bags seized news

नवी मुंबईत प्लास्टिक पिशव्या देणारे विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पालिकेच्या माध्यमातून धडक कारवाई करत तब्बल दोन हजार प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या आहेत.

plastic bags seized
एपीएमसी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

By

Published : Mar 12, 2021, 3:15 PM IST

नवी मुंबई -प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर नवी मुंबईत पूर्णपणे थांबला पाहिजे याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये धडक कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक पिशव्या देणारे विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पालिकेच्या माध्यमातून धडक कारवाई करत तब्बल दोन हजार प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या आहेत.

एपीएमसी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

हेही वाचा -मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : सचिन वझेंची नियंत्रण कक्षात बदली

त्रयस्थ व्यक्ती म्हणून दिली नवी मुंबई मनपाच्या अधिकारी वर्गांने भेट:

नवी मुंबईतील कोपरखैरणे विभागात स्वच्छतेविषयक पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि सहा. आयुक्त व कोपरखैरणे विभाग अधिकारी अशोक मढवी यांना एका फेरीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी आढळली. त्यावर कारवाई करीत त्यांनी फेरीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी कुठून आली याची माहिती घेण्यास सुरूवात केली.तसेच फेरीवाल्यांने ज्या दुकानदाराकडून त्या प्लास्टिक पिशव्या घेतल्या, त्या दुकानाला त्रयस्थ व्यक्ती म्हणून या अधिका-यांनी भेट दिली व प्लास्टिक पिशव्या हव्या आहेत अशी मागणी केली. त्याने पिशव्या दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई करीत त्याने कुठून प्लास्टिक पिशव्या खरेदी केल्या याची माहिती घेतली असता अखेरीस सेक्टर 19 ए तुर्भे येथील एपीएमसी मार्केट मधील एल.एन.ट्रेडींग कंपनीच्या दुकानात व गाळ्यात साधारणत: 2 हजारहून अधिक किलोचा प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा हाती लागला. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साठा पकडण्याची ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एपीएमसी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

हेही वाचा -एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मंत्री उदय सामंतांचा विरोधकांवर पलटवार

पिशव्यांचा साठा हाती घेत केला दंड वसूल:

हा प्लास्टिक पिशव्यांचा साठा महानगरपालिकेने ताब्यात घेतला असून दुकानदाराकडून 15 हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. याशिवाय एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, नगररचनाकार केशव शिंदे, विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त अशोक मढवी यांच्या इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details