ती माझ्या आयुष्यात आली, तिने माझ्या आयुष्याचसोनं केलं ठाणे: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वसामान्य प्रवासी सेवा देताना अहोरात्र काम करताना कर्मचारी आणि प्रवासी हे नाते देखील घट्ट झाले आहेे. मात्र कर्मचारी आणि परिवहन महामंडळाची एसटीचे अनोखे नाते आपल्याला ठाण्यात पाहायला मिळत आहे. लालपरी म्हटले की अनेकांना आठवते ती एसटी महामंडळाची बस. या लालपरीसोबत अनेकांच्या वेगळ्या भावनिक आठवणी असतात. याच लालपरीने अनेक वर्षापासून गावांना प्रवास सेवा देवून महत्त्वपूर्ण काम केले. तसेच याच लालपरीवर अनेकांचे प्रेम आहे.
हे वाक्य एका प्रेयसीसाठी नसून एसटीसाठी:ती माझ्या आयुष्यात आली, तिने माझ्या आयुष्याचसोनं केलं. तिला मी स्वतःच्या मुलासारख जपले, तिच्यावर मी आयुष्यभर जीवापाड प्रेम केले. मी तिला देव मानतो. मी 30 वर्ष सोबत राहिलो. तिने मला सर्व काही दिलं हे वाक्य एका प्रेयसीसाठी नसून एका चालकाने लालपरीचा निरोप घेताना उद्गागरलेली आहेत. चालक लालपरीचा निरोप घेताना भाऊक का झाला? चालकांने अशी वाक्य का वापरली आणि ही घटना कुठे घडली आहे. हे सर्व जाणून घेणार आहोत.
आयुष्याचे सोने झाले:मधुकर सोपान कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील शेलू जळगा गावातील रहिवासी आहेत. ते 1976 ला मुंबईत आले. सुरुवातीला खासगी वाहनावर वाहक म्हणून काम केले, नंतर लालपरीवर चालक म्हणून ठाणे आगर 2 मध्ये 1986 ला रुजू झाले. लालपरी जशी आयुष्यात अली तसे आयुष्याचे सोने झाल्याचे कांबळे सांगतात. एक मुलगा वकील, 2 मुले आभियंता हे फक्त लाल परीमुळेच झाल्याचे ते अभिमानाने सांगतात. लालपरीला त्यांनी जीवापाड जपले. 30 वर्षाच्या सेवेमध्ये एकही अपघात झाला नाही. या कामगिरीसाठी त्यांना शासनाने पुरस्कार देखील दिला. कसा आहे कांबळे यांचा प्रवास त्यांच्याकडूनच ऐकताना लालपरी आणि त्यांच्याशी घट्ट नाते असलेल्या कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटतो.
सेवानिवृत्तीचे समाधान:एस्टी बसेसची अवस्था ही बिकट असते. त्यांची देखभाल पुरेशी नसतानाही अनुभवामुळे अपघात टाळण्याची झालेली क्षमता पाहिजे. त्यांनी अनेक वर्ष सेवा केल्यानंतर ही कोणताही अपघात होवू न दिल्याने कांबळे यानी अभिमान व्यक्त केला आहे. आपल्या कामाला सुरूवात करताना लालपरीच्या पाया पडून दिवसाची सुरुवात करणाऱ्या या चालकाला लालपरीचा निरोप घेताना अश्रू अनावर झाले.आपल्यासाठी लालपरी सर्वकाही असल्याचे कांबळे सांगतात. याच सेवेमुळे मुलांना अभियंता बनवता आले याचा सार्थ अभिमान कांबळे यांना आहे.
हेही वाचा:Padma award पद्मश्री पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल गजानन माने यांचा सत्कार