महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुरबाडमध्ये एसटी आणि खासगी बसची समोरासमोर धडक ; 21 जखमी - Thane accident news

अपघात झालेल्या बसच्या मागे कार असल्याने त्या कारलाही धडक लागली. मात्र,  कारमधील माजी आमदार दिगंबर विशे   सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.

एसटी आणि खासगी बसची समोरासमोर धडक

By

Published : Oct 31, 2019, 10:39 PM IST

Updated : Oct 31, 2019, 11:18 PM IST

ठाणे- मुरबाड येथील सारिका हॉटेलजवळ एसटी आणि खासगी बसची समोरासमोर जोरात धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये वाहन चालकासह 21 प्रवासी जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात झालेल्या बसच्या मागे कार असल्याने त्या कारलाही धडक लागली. मात्र, कारमधील माजी आमदार दिगंबर विशे सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या अपघातानंतर एसटी महामंडळाच्या एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळाला भेट दिली नाही. त्यामुळे शासनाने जर तत्काळ मदत केली नाही, तर उद्यापासून आंदोलन करण्याचा नागरिकांनी इशारा दिला आहे.

अपघातग्रस्त एस.टी बस तुळई- मुरबाडकडे येणारी आहे. यामध्ये विढे गावातील 2 प्रवाशी गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Last Updated : Oct 31, 2019, 11:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details