ठाणे - एका क्रीडा प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचारासह अमानुष मारहाण केली आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना डोंबिवलीतील मानपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामेश्वर पाठक ( वय 31 वर्षे), असे अटक केलेल्या क्रीडा प्रशिक्षकाचे नाव ( Sports Coach ) आहे.
तरुणीवर शारिरिक अत्याचार करत, फोटो व्हायरल करण्याची धमकी -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 वर्षीय पीडित तरुणी, डोंबिवली परिसरात राहते. 2012 साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली ( State Level Competition ) होती. त्यावेळी तिचे कोच असलेल्या आरोपी रामेश्वर पाठक याने त्या पीडित तरुणीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक संबध ठेवले. त्यातच काही महिन्यानंतर या दोघांच्या प्रेमाचे नातेसंबंध व्यवस्थित सुरू असताना 2019 नंतर दोघांमध्ये अचानक खटके उडायला लागले. त्यातच पीडित तरुणी दुसऱ्या मुलांशी बोलत असल्याचे पाहून आरोपी रामेश्वर तिला मारहाण करायचा, अशीच मारहाण 18 मार्च, 2022 रोजी रामेश्वरने एका कारणावरुन लोखंडी रॉडने पीडित मुलीला अमानुष मारहाण केली. इतकच नव्हे तर त्याने तरुणीवर शारीरिक अत्याचार करत अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली.