ठाणे - शहराच्या नकाशात जरी येऊर पर्यटन स्थळाच्या ( Yeoor Hill Station In Thane ) यादीत असले, तरीही प्रत्यक्षात येऊरच्या निसर्गरम्य वातावरणातून पर्यटन संपुष्ठात आलेले आहे. येऊर या हिल स्टेशनला काँक्रिटीकरणाची कीड लागली असून ढाबे आणि विनापरवाना मद्य पुरवणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेल्सची येथे भरमार आहे. यामुळेच हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ मद्यपींचा अड्डा ( Drunk People Rush In Yeoor Hill Station At Thane ) झाल्याची तक्रार आता स्थानिक करत आहेत. मात्र येऊर हिल स्टेशनवर ( Hill Station In Thane ) सुरु असलेली बेकायदेशीर हॉटेल्स, ढाबे आणि मद्यपींची पहाटेपर्यंतची जत्रा सुरूच आहे.
ठाण्याचे हिल स्टेशन अशी ख्यातीयेऊरची ओळख आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ( Sanjay Gandhi National Park ) म्हणून होती. मात्र आता या ठिकाणाला मध्यपींचा अड्डा असे संबोधले जाते. येथील धाबे, हॉटेल्स आणि मद्यपींची जत्रा बंद होऊ शकली नाही. चक्क लॉकडाऊनमध्येही येऊर सुरूच होते. आता येऊर नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत आहे. ढाबे, हॉटेल्स आणि मद्यापींची जत्रा अशी येऊरची ओळख झालेली आहे. याच येऊरला काँक्रिटीकरणाची कीडही लागलेली आहे. हिरव्यागार येऊरमध्ये हिरवळ नाहीशी होत आहे. तर काँक्रीटीकरण वाढत चालले आहे. चक्क क्रिकेटची मैदाने टर्फ बंदिस्त बनवून ती भाड्याने देण्याचा फंडा सुरु असल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र यावर कुठल्याही प्रकारे आजतागायत कारवाई करण्यात आलेली नाही.
पार्यावरण प्रेमी परागंदा, रोज भरते मद्यपींची जत्रायेऊर हिल स्टेशन ( Yeoor Hill Station In Thane ) हे ठाण्याचे महाबळेश्वर आहे. पर्यावरण प्रेमी या ठिकाणी फेरफटका मारीत होते. काळानुसार येऊरच्या हिरवळीवर हॉटेल, ढाबे अन् ढाब्यात मद्यपींची जत्रा सुरु झाल्यानंतर पर्यटन स्थळ असलेल्या येऊरकडे पर्यटकांनी ( Tourist Not Come In Yeoor ) आणि पर्यावरण प्रेमींनी पाठ फिरवली. येऊरमध्ये सुरु असलेले बेकायदेशीर ढाबे आणि हॉटेल्स सोबतच विनापरवाना पुरविण्यात येणारे मद्य याकडे वर्तकनगर पोलिसांसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करत आहेत. तर शांत आणि निसर्गरम्य येऊरमधील कलकलाट आणि धुडगूस बंद होईल का? असा प्रश्न समाजसेवक यांच्यासह नागरिक उपस्थित करीत आहेत.