महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरिष्ठांमुळे मी सी-६० मध्ये जाऊ शकलो नाही, एन्काउंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रेंचा गौप्यस्फोट - naxal attack

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील पोस्टिंग म्हणजे आपल्या पोलीस दलासाठी एक आव्हानच असते. महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सी - ६० या नक्षलविरोधी पथकाच्या वाहनाला भूसुरुंग स्फोटाने उडवून दिले होते. यात १५ जणांना वीरमरण आले होते.

एन्काउंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रेंचा गौप्यस्फोट

By

Published : May 4, 2019, 1:36 PM IST

ठाणे- आपण नक्षलवाद संपवला असता, पण वरिष्ठांनी सी-६० मध्ये मला मुद्दाम सामील न केल्याचा सनसनाटी आरोप एन्काउंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे यांनी केला आहे. गरज पडल्यास पुन्हा पोलीस दलासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वरिष्ठांमुळे मी सी-६० मध्ये जाऊ शकलो नाही, एन्काउंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रेंचा गौप्यस्फोट

रवींद्र आंग्रे पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी ५४ गुंडांना यमसदनी पाठवले आहे. यात ३३ गुंडांना मुंबईमध्ये आणि २१ गुंडांना ठाण्यात एन्काऊंटर करून ठार केले आहे. यात सुरेश मंचेकर यांचा देखील समावेश आहे. जीवाची बाजी लावून काम करणे ही त्यांची खुबी आहे. तसेच मोठ्या खबऱ्यांचे जाळे त्यांच्याकडे आहे. पण, त्यांनाही गडचिरोली येथे काम करताना वरिष्ठ पोलिसांचा विचित्र अनुभव आला असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील पोस्टिंग म्हणजे आपल्या पोलीस दलासाठी एक आव्हानच असते. महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सी - ६० या नक्षलविरोधी पथकाच्या वाहनाला भूसुरुंग स्फोटाने उडवून दिले होते. यात १५ जणांना वीरमरण आले होते.

सुवेज हक यांच्यावर केला आरोप-

या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त कसा करावा ही एक डोकेदुखी असतानाच माजी पोलीस अधिकारी व एन्काउंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपण C - ६० पथकात बदली करून घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु तत्कालीन पोलीस अधीक्षक मोहम्मद सुवेज हक यांनी आपली बदली तिथे न करता आपल्याला कंट्रोल रुमला बसवून ठेवल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

आपण गडचिरोली भागात पोस्टिंगला असताना तेथील सखोल अभ्यास तर केलाच होता. परंतु विदेशातून काही विशिष्ठ प्रकारची ट्रॅकर्ससारखी यंत्रणा मागवली होती. ज्याचा उपयोग नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी झाला असता. परंतु बदलीकरून घेण्याचे आपले सर्व प्रयत्न व्यर्थ गेल्यामुळे आजही तिथे जवानांना आपले प्राण गमवावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तेथील C- ६० पथकातील पोलीस अधिकारी आपल्याला सर्वतोपरी मदत करत होते व आपण मागवलेल्या विदेशी यंत्रणेमुळे संपूर्ण नकक्षलचळवळच संपुष्टात आली असती. परंतु, काही कारणास्तव तत्कालीन अधीक्षकांनी आपल्याला नुसते बसवून ठेवल्यानेच आजपर्यंत अनेक जवानांना वीरमरण आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details