महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बायकोला माहेरी पाठवल्याच्या रागातून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या - जन्मदात्या आईची निर्घृण हत्या

बायकोला माहेरी पाठवल्याच्या रागातून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-भोईवाडा परिसरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी अमन मुल्ला (२८) या आरोपी मुलाला अटक केली आहे.

घटनेची माहिती देताना सहाय्य्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार

By

Published : Sep 6, 2019, 6:20 PM IST

ठाणे -बायकोला माहेरी पाठवल्याच्या रागातून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-भोईवाडा परिसरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अमन मुल्ला (२८) या आरोपीला अटक केली आहे. रुक्साना मुल्ला (वय ६२) असे मृत महिलेचे नाव आहे.

बायकोला माहेरी पाठवल्याच्या रागातून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली


गफूर पॅलेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल दुपारच्या सुमाराला एका घरात एका महिलेचा जोर जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन शेजारच्या घरात आली. तेव्हा अमन मुल्ला या तरुणाने आपली आई रुक्साना हिच्यावर प्राणघातक हल्ला केलेला होता. बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत अमनने त्याच्या आईची हत्या केली होती. घरात मिळेल त्या वस्तूने अमनने आईवर हल्ला केला.

हेही वाचा - महाराष्ट्रातील गडकिल्ले पार्ट्यांसाठी वापरायला कोणाच्या बापाची जहागीर नाही - आव्हाड

अमनची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. अमनच्या आईने जबरदस्तीने तिला माहेरी पाठवले होते. अमन वारंवार आपल्या बायकोला बोलावून घेण्याची विनंती आईला करत होता. मात्र, आईने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने चिडून अमनने आईचा खून केला. अमनच्या वहिनी आपल्या दोन मुलांना घेऊन बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अमन विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता अमनला पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details