ठाणे : 'एक राखी बंधन' (One rakhi Bandhan) या संकल्पनेतून डोंबिवलीतील एक बाईकस्वार दरवर्षी डोंबिवली ते कारगिल असा शेकडो किलोमीटरचा प्रवास (Rohit Achrekar journey from Dombivli to Kargil) आपल्या बाईकवर करतो. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने सीमेवरील जवानांना एक अनोखी भेट देण्यासाठी एक दुचाकीस्वार शेकडो किलोमीटरच्या प्रवासाला निघाला आहे. विशेष म्हणजे यावर्षी त्यांनी सैनिकांसाठी 28 हजार राख्या, 750 किलो मिठाई खरेदी केली आहे.
यासाठी राबविला जातो हा उपक्रम :भारतीय लष्कराचे जवान (Indian Army Soldiers) सीमेवर बलिदान देण्यासाठी सदैव तयार असतात. शिवाय देशाच्या रक्षणासाठी ते कुटुंबापासून दूर राहतात. सीमेवर असताना आपल्या बहिणीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सैनिकांच्या भावना लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती रोहित आचरेकर यांनी दिली. तसेच रोहित आचरेकर शाळेत असताना सैनिकांना शुभेच्छा देणारे पोस्टकार्ड पाठवत असे, पण हे पोस्टकार्ड सैनिकांपर्यंत पोहोचते का? याविषयी त्यांच्या मनात शंका होती. रोहित आचरेकर सांगतात की, या पार्श्वभूमीवर सैनिकांसाठी स्वत: काहीतरी करण्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणूनच गेल्या 17 वर्षांपूर्वी हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला. रोहित आचरेकर यांच्यासोबत, त्याचा मित्र प्रेम देसाई, ससून गावडे देखील या उपक्रमात सहभागी झाले आहेत.