ठाणे -समाजसेवक किरण पवार आणि महेश कदम हे गरजू लोकांना आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना मदत म्हणून अन्न, पानी, कपडे, मास्क आणि सॅनिटायझरचे दररोज वितरण करत आहेत. लॉकडाऊन सुरू झालेल्या पहिल्या दिवसापासून त्यांची ही सेवा सुरू आहे. यामध्ये त्यांची आई त्यांना दररोज घरातून जेवण तयार करून देते व त्यांच्या केसकरवाडीचे लोक देखील त्यांच्या या सेवेत सहभागी असतात. समाजसेवक किरण पवार, महेश मोरे, अमोल पाटील, मितेश शाह, संदेश कवितके, वकिल मल्हार सरदेशमुख, वकिल पंकज कावळे, अमित वाघचौरे, अनिल गुप्ता व त्यांचे ईतर मित्रपरिवार हे सर्व मिळून स्टेशन क्षेत्राजवळ उभे असलेले लोक, पोलिस अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांची दुपार व संध्याकाळच्या जेवणाची सोय करत आहेत.
किरण पवार आणि त्यांचे सहकारी करतायत गरजूना मदत - News about corona virus
समाजसेवक किरण पवार आणि त्यांचे सहकारी लॉकडाऊनच्या काळात गरजू लोकांना मदतीचे वितरण करत आहेत. त्यांना केसकरवाडीचे लोक देखील मदत करत आहेत.
समाजकार्याच्या प्रयत्नात सरकारी यंत्रणा कमी पडल्या म्हणून युवकांनी घेतला पुढाकार
सध्या समाजसेवक किरण पवार हे ठाणे परिसरातील अनेक विभागात जाऊन गरजू लोकांना जेवण वाटप करत आहेत. कोरोनाची ही लढाई लढण्यासाठी आपण ही आपली सामाजिक जबाबदारी सांभाळण्यासाठी एकजूट होऊ या आणि त्यांना मदत करू या असे आवाहन या युवकानी केले. दररोज शेकडो लोकांना होणारी ही मदत सरकारी पातळीवर ही होत नसल्याचे दु:ख या युवकाना आहे. मात्र, नुसत्या टाीका करण्यापेक्षा आपणच हे कार्य करावे असे मत युवकानी वक्त केले.