महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात सामाजिक संस्थेचा पुढाकार; तीन हजार आदिवासी कुटुंबांना दिलासा - lockdown in thane

लॉकडाऊमुळे दुर्गम भागातील हजारो कुटुंबांना रोजगार मिळेनसा झाला आहे. यामुळे आदिवसी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलीय. यासाठी मुंबईतील लताबेन शहा प्रतिष्ठानने आदिवासींना मदतीचा हात पुढे केला आहे.

thane social service news
ठाण्यात सामाजिक संस्थेचा पुढाकार; तीन हजार आदिवासी कुटुंबांना दिलासा

By

Published : Apr 7, 2020, 7:12 PM IST

Updated : Apr 7, 2020, 11:18 PM IST

ठाणे - लॉकडाऊमुळे दुर्गम भागातील हजारो कुटुंबांना रोजगार मिळेनसा झाला आहे. यामुळे आदिवसी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलीय. यासाठी मुंबईतील लताबेन शहा प्रतिष्ठानने आदिवासींना मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच त्यांनी जवळपास तीन हजार कुटुंबांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचा संकल्प केला आहे.

ठाण्यात सामाजिक संस्थेचा पुढाकार; तीन हजार आदिवासी कुटुंबांना दिलासा
शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील हातावर पोट भरणाऱ्या आदिवासी बांधवांच्या 700 कुटुंबांना स्नेहल शहा यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट पुरवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अंबाडा, बेंडेकोन शिदपाडा, भोयेपाडा, कुंबाई पाडा, वरसकोल कातकरीवाडी, टेंभा, बेलवड, घाणेपाडा, पळशीन कातकरीवाडी, आंबिवली कातकरीवाडी, माढेपाडा या परिसरातील आदिवासींना या कीटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उर्वरित दहा दिवसांत परिसरातील प्रत्येक भागात जीवनाश्यक वस्तुचे वाटप करणा असल्याची माहिती लताबेन शहा प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्नेहल शहा यांनी दिली आहे.

येणाऱया काळात तीन हजार कुटुंबांपर्यंत अन्नधान्याची मदत तसेच वैद्यकीय सेवा पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत गरजू तसेच उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबांचा सर्व्हे करून त्यांना तात्काळ जीवनाश्यक वस्तुंच्या कीटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

प्रतिष्ठानचे संचालक व खर्डीचे पोलीस पाटील शाम परदेशी यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले. कोणाचीही उपासमार होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांना सांगितले. खर्डी परिसरातील हार विकणारे, दारोदर कपड़े विकणारे, भिकारी, भंगार वेचक, हात मजूर व कामगार यांनाही जीवनाश्यक कीटचे वाटप करण्यात आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

Last Updated : Apr 7, 2020, 11:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details