ठाणे - सध्या देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा परिणाम आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. मात्र, ठाण्यातील सामाजिक संस्था आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला धावली आहे. ठाण्यातील गृहसंकुलात 'द ठाणे हौसिंग फेडरेशन' च्या वतीने आता आंबा पोहोचवला जात आहे. देवगड आणि रत्नागिरी या ठिकाणाहून आंबे आणण्यात आले आहेत. तेही अल्प दरात चांगले आंबे दिले जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.
लॉकडाऊनमुळे आंबा विक्री थंडावली, सामाजिक संस्थेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात - लोकडाऊनमुळं आंबा विक्री ठंडावली
सध्या देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा परिणाम आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. मात्र, ठाण्यातील सामाजिक संस्था आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला धावली आहे. ठाण्यातील गृहसंकुलात 'द ठाणे हौसिंग फेडरेशन' च्या वतीने आता आंबा पोहोचवला जात आहे.
शासनाने आंब्यांच्या प्रती काळजी घेतली असती, मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवली असती तसेच ग्राहक यंत्रणा तसेच अन्नपुरवठा विभाग यांनी पुरवठा केला असता तर नागरिकांना फायदा झाला असता, असे फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर कोकणातील आंबा ठाण्यातील गृहनिर्माण संस्थेत येत आहे. त्याचे ठाणेकर नागरिकांनी स्वागत केले आहे. तसेच आंब्याची किंमत देखील कमी आहे. सरकारने देखील आंबे उत्पादक किंवा विक्रेते यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. शेतकऱ्यांना अशाप्रकारे जर मदत मिळाली तरच आंबा शेतकरी स्थिरावू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.