महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कवितेतून सामाजिक संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा येथील युवा कवी मिलिंद जाधव यांनी ''भिमाचे विचार सांगतोय गाण्यात" अशी कविता सादर करून, सामाजिक संदेश देत आंबेडकर यांची जयंती अतिशय साध्या पद्धतीने घरीच साजरी केली.

कवितेतून सामाजिक संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
कवितेतून सामाजिक संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

By

Published : Apr 14, 2021, 5:39 PM IST

ठाणे -कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा येथील युवा कवी मिलिंद जाधव यांनी ''भिमाचे विचार सांगतोय गाण्यात" अशी कविता सादर करून, सामाजिक संदेश देत आंबेडकर यांची जयंती अतिशय साध्या पद्धतीने घरीच साजरी केली.

घरातूनच वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन

कोरोनाच्या पाश्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे असंख्य अनुयायी घरातूनच आपल्या वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत. असाच एक प्रयत्न मी सोशल मीडियावर कविता सादर करून केला. या कवीतेच्या माध्यमातून मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडले अशी प्रतिक्रिया मिलिंद जाधव यांनी दिली आहे.

कवितेतून सामाजिक संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने जयंती साजरी

महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभागाच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पडघा केंद्रांवर पंचवीस गावे मिळून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने ग्रामस्थांनी जयंती घरीच साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details