ठाणे- काळ्या पांढऱ्या चट्याबट्या साप इमारतीच्या १५ वा मजल्यावर गेल्याची घटना शहरात घडली. या सापाला पाहून इमारतील कामगारांनी पळ काढला. ही घटना शहाड परिसरात नवव्याने उभारण्यात येत असलेल्या २२ मजल्याच्या इमारतीत घडली.
दुर्मिळ रुखई साप चढला इमारतीवर, मजूरांनी ठोकली धूम - साप
काळ्या पांढऱ्या चट्याबट्या साप इमारतीच्या १५ वा मजल्यावर गेल्याची घटना ठाणे शहरात घडली.
कल्याण पश्चिमेकडील परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहेत. त्यामुळे बिळातून विषारी, बिनविषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आज पुन्हा एकदा शहाड परिसरातील नव्याने उभारण्यात येत असलेल्या भल्यामोठ्या उंच गृह संकुलच्या ठिकाणी घडली. या संकुल उभारणीसाठी काही मजुर १५ व्या मजल्यावर दुपारच्या सुमाराला काम करत होते. त्यावेळी लांबलचक साप वेटोळे घालून स्लॅबच्या खाली बसल्याचे दिसल्याने एका मजुराचा थरकाप उडाला. त्याने इतर मजुरांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्व मजुरांनी त्या ठिकणी धाव घेतली.
सुनील शंभो नावाच्या व्यक्तीने १५ व्या मजल्यावर साप आल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्राने घटनास्थळी जाऊन सापाला शिताफीने पडकले. त्यानंतर त्याने कापडी पिशवीत या सापाला बंद केले. हा साप ४ फुटाचा बिनविषारी असून दुर्मिळ रुखई जातीचा आहे. मंगळवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवागी घेवून हा साप जंगलात सोडणार असल्याच्याही सर्पमित्राने माहिती दिली.