ठाणे- दररोज पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक तक्रारदारांची हजेरी लागलेली असते. मात्र, ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर एक साप आढळून आला. त्याला पाहण्यासाठी अनेकांनी येथे गर्दी केली होती.
कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर आढळला भलामोठा साप - साप बातमी ठाणे
कासारवडवली येथील संस्कार रेसिडन्सी समोरील प्राईड इमारती समोरील मुख्यद्वारावर काल रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक सरपटण्याचा आवाज आला. मुख्यद्वारावर असलेल्यांना त्याठिकाणी मोठा फणा काढून उभा राहिलेला किंग कोब्रा दिसला.

हेही वाचा-यवतमाळ : घरघुती वादातून नातवाने केला आजीचा खून
कासारवडवली येथील संस्कार रेसिडन्सी समोरील प्राईड इमारती समोरील मुख्यद्वारावर काल रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक सरपटण्याचा आवाज आला. मुख्यद्वारावर असलेल्यांना त्याठीकाणी मोठा फणा काढून उभा राहिलेला किंग कोब्रा दिसला. हा साप पाहून स्थानिकांची भांबेरी उडाली. बहुतेक ठिकाणी साप दिसल्यास तो विषारी आहे की नाही याची शहानिशा न करताच थेट सापाला मिळेल त्या वस्तूने मारले जाते. मात्र, प्राईड रेसिडन्सी इमारतीतील रहिवाशांनी सर्प मित्रांना फोन केला. सर्प मित्राने हा साप पकडून जंगलात साडला आहे.