नवी मुंबई -वाशी ईटीसी कोविड केंद्रात साप घुसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सर्पमित्र मंगेश संभेराव यांच्या मदतीने सापाला पकडून अखेर सुखरुप जंगलात सोडण्यात आले. मात्र कोविड सेंटरमध्ये साप घुसल्याचे वृत्त पसरताच परिसरातील रुग्णांचा काही काळासाठी थरकाप उडाला होता.
वाशीच्या ईटीसी कोविड केंद्रात साप... हा व्हिडिओ पाहाच!
वाशी ईटीसी कोविड केंद्रात साप घुसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे वृत्त पसरताच परिसरातील रुग्णांचा काही काळासाठी थरकाप उडाला होता.
शहरातील कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच शाळा बंद असल्याने वाशीतील दिव्यांग मुलांच्या ईटीसी केंद्राचे देखील कोविड सेंटर बनवण्यात आले. सध्या याठिकाणी काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच इन्स्टिट्युशनल क्वारन्टाइनची सोय या ठिकाणी आहे.
मात्र दुपारी या कोविड सेंटर परिसरात एक धामण जातीचा साप निदर्शनास आला. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. हा साप जवळपास सहा फुटांचा होता. साप दिसल्यानंतर काही वेळातच कोविड सेंटरच्या नोडल अधिकाऱ्यांनी तत्काळ सर्पमित्र संभेराव यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर संभेराव यांनी सर्पाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.