महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिनी बसमध्ये नाग शिरल्याने चालकासह प्रवाशांची उडाली भंबेरी - snake enterd in bus thane

बस कल्याणहून शहाडला जात होती. बस वालधुनी पुलावर पोहोचताच चालकाला अचानक एक नाग रस्त्यावर दिसला. नागाचा जीव वाचविण्यासाठी चालकाने बसचा ब्रेक दाबला. मात्र, तो नाग घाबरून बसच्या टायरवरून गाडीच्या इंजिनमध्ये शिरला.

thane
मिनी बसमध्ये नाग शिरल्याने चालकासह प्रवाशांची उडाली भंबेरी

By

Published : Jan 6, 2020, 8:05 AM IST

ठाणे -कल्याण-मुरबाड रोडवरील वालधुनी पुलानजीक मिनी बसमध्ये नाग शिरल्याची घटना घडली. मिनी बससमोर रस्त्यावर अचानक नाग आल्याने चालकाने ब्रेक दाबून नागाचा जीव वाचवला. मात्र, नाग घाबरून बसमध्ये शिरल्याने चालकासह प्रवाशांची भंबेरी उडाली.

मिनी बसमध्ये नाग शिरल्याने चालकासह प्रवाशांची उडाली भंबेरी

हेही वाचा -भाजप नगरसेविकेचा पती दिपक सोंडेवर एक कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

गेल्या आठ दिवसापासून थंडीचा कडाका वाढल्याने मुक्या प्राण्यांसह सरपटणारे प्राणीही गरम उब मिळेल अशा ठिकाणांच्या शोधात भटकताना दिसत आहे. शनिवारी रात्रीच्या सुमाराला कल्याण रेल्वे स्थानक ते शहाड येथील एका कॉप्लेक्सचे रहिवासी मिनी बसमधून येत होते. बस कल्याणहून शहाडला जात होती. यावेळी बस वालधुनी पुलावर पोहोचताच जात असताना चालकाला अचानक एक नाग रस्त्यावर दिसला. नागाचा जीव वाचविण्यासाठी चालकाने बसचा ब्रेक दाबला. मात्र, तो नाग घाबरून बसच्या टायरवरून गाडीच्या इंजिनमध्ये शिरला. चालकाने त्या नागाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या नागाला बसच्या गरम इंजिनची उब मिळाल्याने तो नाग आणखी आतमध्ये जावून बसला. बस रस्तातच उभी केल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने चालकाने हिंमत करून बस कॉप्लेक्सच्या मुख्य प्रवेश दारापर्यत आणून रस्त्याच्या कडेला लावली.

हेही वाचा -तब्बल २५ वर्षांतर दादोजी कोंडदेव मैदानात रंगला सामना, दिलीप वेंगसरकर यांनी केली नाणेफेक

त्यांनतर कॉप्लेक्समधील रहिवासी गिरीश नारंग यांनी वार संस्थेचे सर्पमित्र हितेश करंजावडकर याला संपर्क करून बसच्या इंजिनमध्ये नाग शिरल्याची माहिती दिली. सर्पमित्र हितेश घटनास्थळी येवून त्याने १० ते १५ मिनिटांत या नागाला शिताफीने इंजिनमधून बाहेर काढून पकडले. नाग पकडल्याचे पाहून चालकासह प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा नाग इंडियन कोब्रा जातीचा विषारी नाग ५ फुट लांबीचा होता. या नागाला कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश करंजावडकर याने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details