महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बापरे बाप गुरुजी वर्गात, घुसला साप'; दप्तर सोडून विद्यार्थ्यांनी काढला पळ! - snake entered Classroom

विद्यार्थी शिक्षणात गुंग असतानाच भलामोठा साप खिडकीतून वर्गात घुसल्याचे पाहताच विद्यार्थ्यांनी दप्तर सोडून वर्गातून पळ काढत एकच आरडाओरड केला. ही घटना भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील पंचक्रोशी हायस्कुलमध्ये घडली.

snake entered Classroom
वर्गात शिरला साप

By

Published : Nov 12, 2021, 5:32 PM IST

Updated : Nov 12, 2021, 10:35 PM IST

ठाणे - शाळेत वर्ग सुरू असतानाच भलामोठा साप(snake entered in Classroom) खिडकीतून वर्गात शिरला. हे पाहताच विद्यार्थ्यांनी दप्तर सोडून वर्गातून पळ काढत आरडाओरड केली. ही घटना भिवंडी तालुक्यातील लोनाडनजीक चौधरपाडा येथील पंचक्रोशी हायस्कुलमध्ये घडली आहे.

वर्ग सुरू असताना शिरला साप

हेही वाचा -साप आणि मुंगसाची लढाई; पाहा व्हिडिओ

विद्यार्थी वर्गात असतानाच भलामोठा साप शिरला -

कोरोनाकाळात राज्यात शाळा बंद होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वीच पुन्हा शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातच भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शाळाही सुरू करण्यात आली आहे. त्यातच आज दुपारच्या सत्रात शाळा सुरू असतानाच भलामोठा साप खिडकीतुन वर्गात घुसला. या सापाला पाहून विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होऊन एकच गोंधळ उडाला होता. शिक्षक नामदेव लोखंडे यांनी सर्पमित्र दत्ता बोबे यांच्याशी संपर्क करून वर्गात साप घुसल्याची माहिती दिली.

वर्गात साप घुसल्याने अर्धा तास वर्ग बंद -

साप वर्गातील खिडकीतच असल्याने कोणाचीही वर्गात जाण्याची हिंमत होत नव्हती. त्यामुळे अर्धा तास वर्ग बंद करण्यात आला होता. तर दुसरीकडे माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोबे यांनी घटनास्थळी येऊन या सापाला पकडले. साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून, साडेसात फूट लांबीचा आहे. या सापाला वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने लगेच जंगलात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे यांनी दिली आहे.

हेही वाचा -VIDEO : प्रणयक्रिडेत मग्न असणाऱ्या सापाच्या जोडप्याला पकडणे भोवले, सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

Last Updated : Nov 12, 2021, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details