ठाणे :हनुमंत दत्तु ठाणगे (वय ६२), संदीप रामचंद्र दावानी (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कारचा मालक तथा दारू माफियांचा मोरक्या दीपक जियांदराम जयसिंघानी हा फरार झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली कि, कल्याण-पडघा मार्गावरील देवरुंग गावातील एका गोदामात बनावटी विदेशी मद्याचा साठा लपवून ठेवला आहे. त्या माहितीनुसार भरारी पथक आणि राज्य उत्पादन शुल्क, कल्याण विभागाच्या पथकासह भिवंडी आणि उल्हासनगर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत २२ जानेवारी रोजी त्या गोदामावर छापेमारी केली. या गोदामात साठा केलेले दमण व हरियाणा राज्य निर्मित तसेच महाराष्ट्र राज्यातील बनावट मद्याच्या साठ्याचे एकूण २६६ बॉक्स जप्त करण्यात आले.
Thane Crime : कपड्याच्या आडून बनावट विदेशी मद्याची तस्करीचा पर्दाफाश; लाखोंचे मद्य जप्त
कपड्याच्या आडून बनावट विदेशी मद्याच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आले आहे. छापेमारीत कल्याण पडघा मार्गावरील एका गोदामासह एका कारमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लाखोंचा विदेशी मद्याचा बनावटी साठा जप्त केला. या प्रकरणी दोन दारू माफियांना अटक केली आहे.
मुद्देमाल जप्त :प्राप्त माहितीनुसार तपास पथकाने कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या पार्किंगमध्ये धाड टाकून त्या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमधून दमण राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण २५ बॉक्स जप्त करण्यात आले. या दोन्ही छापेमारीत एकूण २९१ बॉक्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या छापेमारीत एकूण रू. ५६ लाख ७५ हजार ६४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर तिन्ही दारू माफिया विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मोरक्याच्या नावे वाईन शाप :छापेमारीत जप्त केलेला मुद्देमाल हा जुन्या कपड्याच्या गोण्यामध्ये लपवून ठेवून महाराष्ट्र राज्यात आणल्याचे उघडकीस आले आहे. तसेच फरार आरोपी दिपक जियांदराम जयसिंघानी याच्या नावे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यामध्ये अनुज्ञप्ती (वाईन शॉप) असल्याचे निर्दशनास आले आहे.
हेही वाचा :Thane Crime : ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडत चोरी करण्याचा प्रयत्न; चोरटे सीसीटीव्हीत कैद