ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोबाईलच्या किमती आणि त्यावर असलेला सरकारी कर हा टाळून आता चक्क मोबाईल फोनतची स्मग्लिंग (Smuggling Mobile Phones Without Import Duty) वाढलेली आहे. भारताबाहेर असलेल्या मोबाईलच्या किमती आणि भारतात इम्पोर्ट ड्युटी भरून असलेली किंमत यात तफावत असल्यामुळे मोबाईल स्मगलिंग (Mobile phone smuggling India) करणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेला हा तस्करीचा व्यवसाय आजही सुरू आहे. (thane crime), (thane latest news)
तस्करीतील मोबाईलची बाजारात सर्रास विक्री -जर आपण महागडे मोबाईल वापरणारे असाल तर भारतामध्ये असलेल्या मोबाईलच्या किमती आणि विदेशात असलेल्या किमती याची तफावत आपल्याला माहितीच असेल .यावर आता तस्करांनी चांगलीच साठ-गाठ करून भारताबाहेरून फोन तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे लाखाच्या आसपास असलेल्या किमतीचे फोन भारतात दीड लाखाच्या आसपास मिळत असल्यामुळे तस्करी करून हे मोबाईल विकले जात आहेत. एअरपोर्टवरून किंवा समुद्रमार्गे येत असताना हे मोबाईल फोन्स रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यापैकी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही साठ-गाठ सुरू आहे. जास्त पैसे कमावण्याच्या नादात मोबाईल फोन विक्रेते असे महागडे फोन्स बाजारात उपलब्ध नाहीत, असे ग्राहकांना सांगतात आणि मग दुसरा पर्याय म्हणून तस्करी केलेले असे फोन्स ग्राहकाला वाढीव किंमतीत देतात आणि मोठा नफा कमावतात.
भारताचा महसूल बुडतोय -इम्पोर्ट ड्युटी न चुकवता भारतात आलेले हे लाखो रुपयांचे फोन भारताच्या प्रगतीसाठी अडथळा निर्माण करणारे आहेत. कारण यावर असलेली इम्पोर्ट ड्युटी न भरून हे फोन येत असल्यामुळे भारताच्या तिजोरीला इम्पोर्ट ड्युटीचा तोटा सहन करावा लागत आहे.