महाराष्ट्र

maharashtra

भाईंदर पश्चिममधील झोपडपट्टीवासियांचा कोरोना चाचणीला विरोध; पालिकेवर मोर्चा

By

Published : Sep 21, 2020, 5:16 PM IST

भल्या मोठ्या इमारती आहेत, त्याठिकाणी मनपा कर्मचारी का जात नाही. झोपडपट्टीमध्येच तपासणी का केली जाते? यातून प्रशासनाचा दुटप्पीपणा समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही मनपासमोर आंदोलन केले. हा प्रकार थांबला नाही तर, आंदोलन तीव्र करू, असा इशारा आंदोलक अश्विनी कांबळे यांनी प्रशासनाला दिला.

कोरोना चाचणीला विरोध
कोरोना चाचणीला विरोध

ठाणे- मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कोविड चाचणी केली जात आहे. परंतु, या मोहिमेला काही ठिकाणी विरोध दर्शवला जात आहे. आज भाईंदर पश्चिमच्या गणेश देवल नगरमधील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा नेऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

माहिती देतान आंदोलक अश्विनी कांबळे

मिरा भाईंदर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात मृत्यूच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन कोविड तपासणीला सुरुवात केली आहे. भाईंदर पश्चिमच्या गणेश देवल नगरमधील रहिवाशांनी या मोहिमेला विरोध केला आहे. याबाबतची नाराजी त्यांनी पालिका मुख्यालयवर मोर्चा काढून दर्शवली.

मुख्यप्रवेशद्वार ढकलून, सुरक्षारक्षकाला धक्का देत नागरिकांनीपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारची कोविड चाचणीची गरज नाही. आम्ही निरोगी आहोत. तसेच, जे मनपा कर्मचारी आमच्या वस्तीमध्ये येत आहेत, ते लहान मुलांना धरून जबरदस्ती तपासणी करत आहे. त्यामुळे आम्हाला तपासणी करायची नसून या पुढे कर्मचाऱ्यांना आम्ही पळवून लावू. असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

मिरा भाईंदर प्रशासन फक्त झोपडपट्टीमध्येच कोविड चाचणी करत आहे. चाचणी केल्यानंतर अहवाल देखील दिला जात नाही. ज्या झोपडपट्टींमध्ये चाचणी केली जात आहे, त्याठिकाणी एकाही व्यक्तीला ताप, सर्दी किंवा कोरोनाचे कोणतेही लक्षण नाहीत. तरीही तपासणी केली जात आहे. भल्या मोठ्या इमारती आहेत त्याठिकाणी मनपा कर्मचारी का जात नाहीत? झोपडपट्टीमध्येच तपासणी का केली जात आहे? यातून प्रशासनाचा दुटप्पीपणा समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही मनपासमोर आंदोलन केले. हा प्रकार थांबला नाही तर आंदोलन तीव्रकरू, असा इशारा आंदोलक अश्विनी कांबळे यांनी प्रशासनाला दिला.

हेही वाचा-भिवंडी इमारत दुर्घटना : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची घटनास्थळी भेट

ABOUT THE AUTHOR

...view details