महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

House Slab Fell : ठाण्यातील अवैध बांधकामे उठली जिवावर, घराचा स्लॅब कोसळून, तिघे जखमी - three injured

आज सकाळी ठाण्यातील कळवा भागातील एका इमारतीचा स्लॅब (Slab of first floor house fell in Thane) खाली पडल्यामुळे स्लॅब कोसळून 3 जण जखमी (three injured) झाले आहेत. त्यापैकी एकाला गंभीर जखम झाली असून; त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर जखमी वक्तीचे नाव आयुष धामणे असून आहे. डोक्यावर स्लॅब पडल्याने त्याला गंभीर इजा झाली आहे. Illegal constructions came alive

House Slab Fell
घराचा स्लॅब कोसळून तिघे जखमी

By

Published : Oct 31, 2022, 2:17 PM IST

ठाणे :आज सकाळी ठाण्यातील कळवा भागातील एका इमारतीचा स्लॅब (Slab of first floor house fell in Thane) खाली पडल्यामुळे स्लॅब कोसळून 3 जण जखमी (three injured) झाले आहेत. त्यापैकी एकाला गंभीर जखम झाली असून; त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर जखमी वक्तीचे नाव आयुष धामणे असून आहे. डोक्यावर स्लॅब पडल्याने त्याला गंभीर इजा झाली आहे.

Injured boys father reacts


अवैध बांधकामे उठली जिवावर : कळवा भागात सुरू असलेली अवैध बांधकामे (Illegal constructions came alive) आता त्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवावर उठली आहेत. ही अवैध बांधकामे सुरू असताना शेजारी असलेल्या जुन्या इनरातींना धोका निर्माण होतो आणि अशाच कारणामुळे हा अपघात झाला असल्याचे, स्थानिक सांगत आहेत. हा अपघात घडल्यावर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारा आयुष धामणे आणि तळ मजल्यावर असलेल्या गाळ्यात सुरू असलेल्या सलून मधील ग्राहक पार्थ पाटेकर आणि कामगार कादिर सलमानी हे यात जखमी झाले आहेत.

घराचा स्लॅब कोसळून तिघे जखमी




अवैध बांधकामांचा अड्डा कळवा :कळवा भागात सुरू असलेली अवैध बांधकामे मागील अनेक दिवसांपासून प्रशासनाला हाताळता आलेली नाहीत, अशातूनच काही दिवसांपूर्वी दोन बड्या अधिकाऱ्यांमध्ये वाद देखील झाला होता, असा आरोप आता स्थानिक नेते करत आहेत.

घराचा स्लॅब कोसळून तिघे जखमी



नवीन आयुक्तांकडून अपेक्षा :शहरातील पायाभूत सुविधांवर ताण येत असताना रस्ते पाणी या मूलभूत सुविधा देखील मिळणं आता कठीण झालं आहे आणि म्हणूनच वाढणारी बांधकाम ही शहराच्या विकासासाठी अडचण ठरू लागलेली आहेत. शहरातील या अवैध बांधकामामुळे शहर बकाल दिसू लागले आहे. त्यामुळे आता प्रशासनाची धुरा हातात असलेल्या नवनियुक्त आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे ही मागणी नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details