ठाणे - गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १६ रुग्ण आढळले आहे. तर आज ६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, डोंबिवलीतील कोरोनाबधित एका महिलेचा ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवलीत आढळले कोरोनाचे १६ रुग्ण तर एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू - thane covid 19 patients
आज आढळून आलेल्या १६ रुग्णांमध्ये सर्वच मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि त्यांच्या निकट सहवासातील रुग्ण आहेत. यामध्ये कल्याण पश्चिम परिसरात राहणारी ४ वर्षाच्या मुलीचा समावेश असून, ३ पोलीस कर्मचारी देखील कोरोनाबाधित आढळून आले आहे.
विशेष म्हणजे आज आढळून आलेल्या १६ रुग्णांमध्ये सर्वच मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि त्यांच्या निकट सहवासातील रुग्ण आहेत. यामध्ये कल्याण पश्चिम परिसरात राहणारी ४ वर्षाच्या मुलीचा समावेश असून, ३ पोलीस कर्मचारी देखील कोरोनाबाधित आढळून आले आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२१ वर पोहचली असून, यामध्ये मुंबई आणि अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील १३० रुग्णांचा समावेश आहे. तर त्यांच्या निकट सहवासातील ४७ रुग्ण आहेत.
सध्याच्या घडीला विविध रुग्णालयात २२५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर ९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशीही बळी घेतल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ५ वर पोहोचला आहे.