महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किरकोळ वादातून चाकू हल्ला, भाडेकरूसह ६ जण जखमी - रबाळे पोलीस ठाणे

किरकोळ वादातून एकाने आपल्या कुटुंबीयांसह भाडेकरूवर चाकूने हल्ला केला. यात सहा जण जखमी झाले असून भाडेकरूची प्रकृती गंभीर आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहे.

जखमी शिवनाथ शुक्ला
जखमी शिवनाथ शुक्ला

By

Published : Jan 28, 2020, 3:21 PM IST

नवी मुंबई- कौटुंबीक किरकोळ वादातून एका व्यक्तीने कुटुंबातील व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करून हल्लेखोर पळून गेल्याचा प्रकार नवी मुंबईतील घणसोली परिसरात घडला आहे. यामध्ये 6 व्यक्ती जखमी झाले असून हल्लेखोराच्या दिव्यांग मुलीचादेखील समावेश आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

माहिती देताना प्रकाश शुक्ला


किरण पाटील (वय 45 वर्षे), असे या हल्लेखोराचे नाव आहे. तो नवी मुंबईतील घणसोली गावात राहत असून त्याचा पानटपरीचा व्यवसाय आहे. तो भांडखोर स्वभावाचा असल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन वेगळी राहत होती. जवळच वडिलोपार्जित मालिकीचे दुमजली घर आहे. हल्लेखोर किरण पाटील हा खालच्या मजल्यावर, तर त्याचा भाऊ वरच्या मजल्यावर राहत होता. दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भावाने दुरूस्तीचे काम काढल्याने त्याने त्याचे सामान खालच्या मजल्यावर ठेवले होते. दुरूस्तीचे काम होऊनही त्याने सामान खालीच ठेवले होते. याचा राग किरणच्या मनात होता.

हेही वाचा - मुंब्र्यात मुशायऱ्याचे आयोजन; जितेंद्र आव्हाडांसह कन्हैय्या कुमारची उपस्थिती

त्याने दुपारी सगळे एकत्र असताना वाद उकरून काढला व सोबत आणलेल्या चाकूने घरातील सदस्यांवर वार करू लागला. यावेळी त्याने दिव्यांग मुलीलाही लाथा बुक्क्याने मारहाण केली. एवढ्यावर न थांबता त्याने भाडेकरूवरही चाकू हल्ला केला व पळून गेला. यामध्ये त्याची पत्नी रेखा पाटील, भाऊ शंकर पाटील, भावाची पत्नी अलका पाटील व मुलगी शिवांगी पाटील व भाडेकरू शिवनाथ शुक्ला हे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात शिवनाथ शुक्ला हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मूत्रपिंडांला (किडनी) इजा झाली आहे. यामुळे शुक्ला यांच्यावर वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करून मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात येणार आहे.

हेही वाचा - मोफत कर्करोग रुग्णालयाचे लवकर भूमिपूजन - सांबरे

या प्रकरणी हल्लेखोर किरण पाटील याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिली. रबाळे पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - 'सरकारमध्ये सर्व काही आलबेल' कोणतेही मतभेद नसल्याचा एकनाथ शिंदेंचा निर्वाळा

ABOUT THE AUTHOR

...view details