ठाणे - केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेचे खासगीकरण करण्याचा घाट घातला असून, त्या विरोधात देशभरातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रेल्वेचे खासगीकरण करू नये, यासाठी अंजूरफाटा येथील भिवंडीरोड रेल्वे स्टेशन येथे लाल बावटा अंतर्गत असलेल्या डाव्या विचारसरणीच्या सिटू संघटनेतर्फे तीव्र निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध केला.
रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध, 'सिटू'चे भिवंडी रेल्वे स्थानकासमोर आंदोलन - रेल्वेच्या खासगीकरणा विरोधात आंदोलन
केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेचे खासगीकरण करण्याचा घाट घातला असून, त्या विरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रेल्वेचे खासगीकरण करू नये, यासाठी अंजूरफाटा येथील भिवंडीरोड रेल्वे स्टेशन येथे लाल बावटा अंतर्गत असलेल्या डाव्या विचारसरणीच्या सिटू संघटनेतर्फे तीव्र निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भिवंडीरोड रेल्वेस्टेशन येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्यात आले. स्टेशन व्यवस्थापक यांना खासगीकरणाच्या निर्णयाविरोधातील आपल्या तीव्र भावना व्यक्त करणारे निवेदन देण्यात आले आहे. या निदर्शनात कॉ. सुनील चव्हाण, काॅ. कमला गटटू, काॅ. बाबुराव करी, काॅ.कय्युम खान आदींसह पॉवरलूम, विडी कामगार व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात लाल बावटा संघटनेचे रिक्षा चालकही सहभागी झाले होते.