महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्याच्या सिग्नल शाळेतील मुले जाणार 'इस्रो'च्या भेटीला - students isro

ठाण्यातील सिग्नल शाळेत शिकणारे विद्यार्थी अतुल पवार व किरण काळे येत्या १३ मार्च ते १७ मार्च या कालावधीत इस्रोला भेट देणार आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी बनवण्याचा त्यांचा प्रयॊग गेल्या वर्षी डोंबिवली येथे भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आला होता.

isro
सिग्नल शाळेतील मुले जाणार 'इस्रो'च्या भेटीला

By

Published : Jan 31, 2020, 3:40 AM IST

Updated : Jan 31, 2020, 9:31 AM IST

ठाणे- नेहमीच हायवेवर गजरे किंवा विविध प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या ठाण्यातील सिग्नल शाळेतील विद्यार्थी आता सातासमुद्रापार जाणार आहेत. त्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचे इस्रोने देखील कौतूक केलं आहे. ठाण्यातील सिग्नल शाळेत शिकणारे विद्यार्थी अतुल पवार व किरण काळे येत्या १३ मार्च ते १७ मार्च या कालावधीत इस्रोला भेट देणार आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी बनवण्याचा त्यांचा प्रयॊग गेल्या वर्षी डोंबिवली येथे भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आला होता. दिवसभर शिक्षण घेतल्यानंतर सिग्नल शाळेतील विद्यार्थी फावल्या वेळेत विविध प्रकारच्या वस्तू विकतात आणि आपला उदरनिर्वाह करतात.

ठाण्याच्या सिग्नल शाळेतील मुले जाणार 'इस्रो'च्या भेटीला

हेही वाचा -...म्हणून आज, उद्या बँका राहणार बंद

ठाण्यातील तीन हात नाका सिग्नल येथील विद्यार्थ्यांची आता भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणझे इस्रोच्या भेटीसाठी निवड झाली आहे. ठाण्यातील या सिग्नल शाळेतील विद्यार्थी नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांचा प्रकल्प सातासमुद्रापार जाणार आहे. राज्‍यातील शंभराहून अधिक शाळांनी यात सहभाग घेतला होता. त्‍यातील पहिल्‍या दहा शाळातील प्रत्‍येकी दोन मुलांची इस्‍त्रो भेटीसाठी निवड होणार होती. सिग्‍नल शाळेचा या स्‍पर्धेत सातवा क्रमांक आला व सिग्‍नल शाळेत अतुल पवार व किरण काळे या दोन मुलांची इस्‍त्रो भेटीसाठी निवड करण्‍यात आली.

येत्‍या १३ ते १७ मार्च दरम्‍यान ही मुले इस्‍त्रोला भेट देणार असून सलग तीन दिवस तेथे राहून ते इस्‍त्रोबाबत माहिती घेणार आहेत. इस्रोच्या भेटीबद्दल विद्यार्थ्यानी आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेतील शिक्षकांनी देखील त्यांचे कौतूक केले आहे.

Last Updated : Jan 31, 2020, 9:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details