ठाणे :यावर्षी 18 जुलै 2023 पासून बुधवार 16 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावण मास आला असून त्याला पुरुषोत्तम मास मलमास किंवा धोंड्या महिना असे म्हणतात. अधिक श्रावणाचा नंतर गुरुवार 17 ऑगस्ट ते शुक्रवार 25 सप्टेंबर 2023 पर्यंत निज श्रावणमास येणार आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारचे उपवास मंगळागौर पूजन नागपंचमी वगैरे सारखे श्रावण महिन्यातील सर्व सण आणि वृत्तविकल्ले हे श्रावण मासत न करता निज श्रावण मासात करावीत असे पंचांग कर्त्यांचे मत आहे. आपल्या पंचांगांमध्ये चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम करण्यात आला आहे ज्यात मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात तर मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. परंतु कधीकधी एका राशी सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो त्यावेळी पहिला तो अधिक मासा आणि दुसरा तो निजमास असं मानले जाते. यावर्षी रविवार 16 जुलै 2023 रोजी उत्तर रात्री पाच वाजून सहा मिनिटांनी सूर्य कर्क राशीत प्रवेश करीत असून गुरुवार 17 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून 32 मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करत असल्याने अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी दोन नावे देण्यात आली आहेत.
असा करावा उपवास : तर अशा या अधिक मासात काय करावे याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. या अधिक मासात संपूर्ण दिवसाचा उपवास किंवा एक भोजन करावे, देवापुढे दीप प्रज्वलित करून ते 33 अनारसे यांचे दान करावे कारण ते भगवान विष्णूला अर्पण केले असे समजले जाते. आधुनिक काळात जावई विष्णू समान मानला जातो त्यामुळे अधिक मासा जावयाला 33 अनारसे दान देण्याची प्रथा सुरू झाली असावी असाही अंदाज काही पंचांगकर्ते व्यक्त करतात. केल्यावाचून गती नाही अशी कामे अधिक मासात करायला हरकत नाही जसे नामकरण अन्नप्राशन नित्य श्राद्ध हे संस्कार. मात्र देवप्रतिष्ठा, चौल, उपनयन, विवाह,संन्यास ग्रहण, वास्तुशांती, गुहारंभ या गोष्टी अधिक मासात करून येत असे सांगण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मासा दान करावे असे सांगण्यात आले आहे कारण भारतीय संस्कृतीत दानाचे विशेष महत्त्व आहे. परंतु हे दान गुप्तदान असावे जेणेकरून ते समाजातील गरीब गरजू लोकांना तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मिळावे हा त्यामागचा उद्देश आहे.