ठाणे :मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी (Tuesday Mangala Gauri) नवविवाहीत महिलेने (Shravan begins the newlyweds celebrated) लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे असते. पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशिर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी, या हेतूने ही पूजा केली जाते. कोरोना मुळे गेली दोन वर्ष बऱ्याच जणांची मंगळागौर ही घरीच झाली. तर काही महीलांनी ती गृप सोबत ऑनलाईन साजरी केली. आता श्रावण सुरु झाल्याने, सागळी कडे प्रत्येक मंगळवारी मंगळागौर साजरी (Mangala Gauri started) केल्या जात आहे.
कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर, प्रत्यक्ष प्रेक्षकांमध्ये सहभागी होऊन साजरी होणारी ही यंदाची मंगळागौर आमच्यासाठी खूपच आनंदाची आणि भाग्याची आहे. नव्या-जुन्यां परंपरेचा मेळ गुंफून सृजन सख्या मंगळागौरीचा हा खेळ गेल्या सात वर्षांपासुन खेळत आहे. मागच्या वर्षी मंगळागौरीचे खेळ ऑनलाईन होते. परंतू यंदा प्रत्यक्ष मंगळागौर खेळासाठी १२ते१३ ठिकाणी बुकींग झाले (Mangala Gauri teaching classes begin) आणि खूप छान प्रतिसाद मिळत आहे. अशी माहीती सृजनसख्या मंगळागौरी गृपच्या अपर्णा मोडक यांनी दिली.