महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Robbbery In Nalasopara : नकली पिस्तुल दाखवून ज्वेलर्सच्या दुकानात लाखोंची लूट ; आरोपीचा शोध सुरू - fake pistol

नालासोपारा शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा नकली पिस्तुल दाखवून अंदाजे १५ तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली (Show fake pistol robbed jewelers worth lakhs) आहे. पोलिसांना घटनेची माहिती घटनास्थळी पोहचून पंचनामा करत गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेत (Show fake pistol robbed in Nalasopara) आहेत.

Robbbery In Nalasopara
बनावट पिस्तूल दाखवून दागिने लुटले

By

Published : Nov 27, 2022, 10:28 AM IST

Updated : Nov 27, 2022, 11:02 AM IST

ठाणे :नालासोपारा शहरातील पश्चिमेकडील पाटणकरपार्क - परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा नकली पिस्तुल दाखवून अंदाजे १५ तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली (Show fake pistol robbed jewelers worth lakhs) आहे. पोलिसांना घटनेची माहिती घटनास्थळी पोहचून पंचनामा करत गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेत (Show fake pistol robbed in Nalasopara) आहेत.

बनावट पिस्तूल दाखवून दागिने लुटले

सोन्या चांदीचे दुकान :नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर सिग्नलच्या बाजूला असलेल्या शत्रूंजय बिल्डिंगमध्ये सुरेशकुमार धाकड (५८) यांच्या मालकीचे नेकलेस ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. शनिवारी दुपारी पावणे दोन ते अडीचच्या दरम्यान दुकान मालक एकटेच असताना दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपीने दुकानात प्रवेश केला. दुकान मालकाशी बोलणे सुरू केले आणि बहीण येत असल्याचे सांगून दागिने पाहू (Show fake pistol robbed jewelers) लागला.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकारी व शेजारील दुकानदार


हाणामारी व झटापट :त्याचवेळी त्याने हातात असलेले पिस्तूल काढून त्यांना दाखवले. दरम्यान, दुकान मालकाने आरोपीला प्रतिकार केल्याने दोघांमध्ये १० मिनिटे हाणामारी व झटापट झाली. तरीही आरोपीने अर्धा तास झालेल्या घटनेत अंदाजे साडे सहा लाखांचे १५ तोळे सोन्याचे दागिने लुटून पळून गेला ( Robbbery In Nalasopara) आहे.

सुरक्षेचे नियम धाब्यावर :नेकलेस ज्वेलर्स या दुकानात दुपारच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवून लुट केल्याचे सुरेशकुमार यांनी सांगितले. या दुकानात या आधी २००१,२०१०,२०१८ साली चोरी झाली असताना सुद्धा या दुकानदाराने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले होते. विशेष म्हणजे या दुकानातील सीसीटीव्ही बंद होते. पोलीस आता ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे ते तपासत आहे. ज्वेलर्स दुकान मालकांनी सीसीटीव्ही सुरू ठेवून कोणीतरी मदतनीस व दुकानाबाहेर सुरक्षा रक्षक ठेवावा. तसेच दुकानात सायरन ही ठेवावा. जेणेकरून अप्रिय घटना झाल्यावर सुरक्षेसाठी वाजवता येईल, असे आवाहन नालासोपारा पोलीसांनी केले (Show fake pistol robbed) आहे.


डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट पथक :या सीसीटीव्हीत १.३९ ला अज्ञात आरोपी पाठीला पिशवी आणि हेलमेट घेवून आला. त्यानंतर त्याने कॉईनची मागणी केली. ते नाही सांगितल्यावर त्याने माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचे सांगून दागिने दाखवण्यास सांगितले. त्यानंतर मोका साधून त्याने १५ तोळे दागिने पिशवीत घालून झटापट करीत होता. आवाज आल्याने परब चष्मा दुकानदार बाहेर आले. आणि आरोपी व दुकानदाराला विचारले काय झाले ? मात्र दोघांनी काय झाले हे सांगितले नाही. त्यामुळे त्यांच्या समक्ष चोरटा निघून गेला. घटनास्थळी ठाणे येथील डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट पथक येणार असल्याचेही कळते.

Last Updated : Nov 27, 2022, 11:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details