महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhiwandi Minor Girls Rape : धक्कादायक! भिवंडी हादरली; पुन्हा अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून हत्या - Bhiwandi Minor Girls Rape

भिवंडीमध्ये एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका तीन वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर पडीक इमारतीमध्ये अत्याचार केले तसेच तिची हत्या करण्यात आल्याने भिवंडी शहर हादरले आहे.

Shocking! Bhiwandi shock; Again a Minor Girls were Raped and Killed
धक्कादायक! भिवंडी हादरली; पुन्हा अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून हत्या

By

Published : Jan 25, 2023, 4:29 PM IST

ठाणे : अज्ञात नराधमावर शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलामांनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू आहे. भिवंडी शहरातील नागांव परिसर खूपच दाटीवाटीच्या वस्तीतील परिसर आहे. याच परिसरात एका चाळीत मृत चिमुरडी आई-वडिलांसह भावंडासोबत राहत होती. त्यातच काल सकाळच्या सुमारास मृत चिमुरडीचे आई-वडील कामावर गेले होते. तर तिच्या भावंडांसोबत घराच्या बाहेर अंगणात खेळत असतानाच, अचानक बेपत्ता झाली.

दोन दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची घटना भिवंडीमध्ये घडली :दोन दिवसांपूर्वीच तीन वर्षीय अल्पवयीन चिमुरडीला मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या २६ वर्षीय नराधमाने घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्याने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यापाठोपाठ आज पुन्हा अशीच धक्क्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. नागांव परिसरात चिमुरडीला पडीक इमारतीमध्ये नेऊन अत्याचार करण्यात आला. तसेच हत्या केल्याची निर्दयी घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शांतीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार :आई-वडील दुपारी १ वाजल्याच्या सुमारास कामावरून घरी आले. मात्र त्यांना आपली मुलगी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात व आजूबाजूला चौकशी करून तिचा शोध सुरू केला. मात्र, सायंकाळ होत आली तरी तिचा शोध लागत नसल्याने आई-वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाणे गाठून चिमुरडी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात :त्यावरून पोलिसांनीही चिमुरडीचा शोध सुरू केला असता, आज सकाळच्या सुमारास तिच्या घरापासून जवळ असलेल्या एका धोकादायक पडीक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करून अधिक उत्तरणीय तपासणीसाठी आता मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवला आहे.

चिमुरडीवर अत्याचार करून गळा आवळून हत्या :दरम्यान, पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात नराधमाविरोधात अपहरण, पोक्सो व अत्याचारासह हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, लागोपाठ घडलेल्या या दोन्ही अत्याचार करून हत्येच्या घटनेमुळे भिवंडी हादरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details