महाराष्ट्र

maharashtra

Corona Period Rape Cases : धक्कादायक ! कोरोनाच्या काळात ५५८ बलात्कारांच्या घटना उघड

By

Published : Feb 16, 2022, 1:14 AM IST

कोरोना महामारीच्या दोन वर्षात महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये ( Atrocities increased in the Corona epidemic ) लक्षणीय वाढ झाली आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यापैकी काही अरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.

Rape Cases
Rape Cases

ठाणे : कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात असलेल्या विविध ३५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ५५८ बलात्कारांच्या ( 558 rape cases Thane urban areas ) घटना घडल्या आहेत. यापैकी ३३५ अल्पवयीन मुलींवर आणि २२३ महिलांवर अश्या एकूण ५५८ अत्याचारांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे महिलांसह अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने नव्याने अंमलात आणलेल्या कायद्याची भीती नराधमांना नसल्याचे, या अत्याचारांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. खळबळजनक बाब म्हणजे डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराने जिल्हा हादरला होता.

५५८ घटनेतील ९८ टक्के अत्याचारांच्या गुन्ह्यांची उकल -

ठाणे पोलीस आयुक्त परिक्षेत्रात ५ पोलीस परिमंडळाचा समावेश असून यांच्या अंतर्गत ३५ पोलीस ठाणे आहेत. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या वतीने ७ महिने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच कामकाज व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिक घरातच होते. अशात ही अत्याचाराच्या घटना घडत होत्या. दोन वर्षाच्या कोरोना काळात अत्याचारांच्या घडलेल्या घटना पाहता, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या बहुतांश घटनेत आरोपी नातेवाईक, शेजारी तर काही घटनेत लग्नाचे आमिष दाखवून नराधमांनी अत्याचार केले आहेत. तर महिलांमध्येही लग्नाचे आमिषासह, ब्लॅकमेलसह ठार मारण्याच्या धमक्या देऊन नराधमांनी अत्याचार केले आहेत. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत ५५८ घटनेतील ९८ टक्के अत्याचारांच्या गुन्ह्यांची उकल ( Solved 98% of atrocity cases ) करून नराधमांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. तर यामध्ये सामूहिक बलात्कारांच्या घटनांचाही समावेश आहे.

जिल्ह्याला हादरून सोडणारे सामूहिक बलात्कारकांड -

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवलीत एका पंधरा वर्षांच्या अल्पवीयन मुलीवर ( Fifteen year old girl raped Dombivali ) गेल्याच वर्षी ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस ( Dombivli gang rape case ) आली होती. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेला ब्लॅकमेल करून शीत पेयातून गुंगीचे औषध देऊन आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी ३३ आरोपींना आतापर्यत अटक केली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. शिवाय पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त केली. मात्र या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता.

२०२० सालच्या तुलनेत २०२१ मध्ये अत्याचारांच्या घटनेत वाढ -

दोन वर्षाच्या कोरोना काळात म्हणजे २०२० सालात २१९ अत्याचारांचे गुन्हे घडले ( Record of 219 atrocities in 2020 ) होते. यापैकी २१४ गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी नराधमांना अटक केली. यामध्ये १३६ अल्पवयीन मुलींवर तर ८३ महिलांवर अत्याचारांच्या अश्या एकूण २१९ घटना २०२० साली घडल्या आहेत. मात्र २०२० सालच्या तुलनेत २०२१ सालच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊंन ३४० घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये १९९ अल्पवयीन मुलींवर तर १४१ महिलांवर अत्याचार अश्या एकूण ३४० घटनांची नोंद झाली. तसेच जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यत विविध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या ३२९ गुन्हांची उकल करीत नराधमांना अटक करण्यात आली आहे.

लैंगिक छळवणूकीसह विनयभंगाच्या घटनेतही वाढ -

२०२० साली विनयभंगासह लैंगिक छळवणूकींचे ४१२ गुन्हे घडले ( 412 cases of sexual harassment and molestation ) होते. यापैकी ३८० गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात आली. यापैकी ११२ अल्पवयीन मुलींनी तर २६८ महिलांनी गुन्हे दाखल केले. मात्र २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यत ५२० घटना विनयभंगासह लैंगिक छळवणूकीच्या घडल्या आहेत. यामध्ये ३७१ महिलांवर तर १४९ अल्पवयीन मुलींवर विनयभंगासह लैंगिक छळवणूक झाल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले. यापैकी ४७५ गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details