ठाणे -आएनएस विक्रांत जहाज ( INS Vikrant ) वाचवण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैयांनी जमा केलेले पैसै राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याची बाब समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्याच्या मार्फत हे प्रकरण समोर आल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले ( Sanjay Raut Allegation Kirit Somaiya ) आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी ठाण्यात भव्य मोर्चा काढला (Shivsena Protest Against Kirit Somaiya ) आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमैयांनी राज्यातील महाविकास आघाडी विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांच्यामुळे अनेक बडे नेते अडचणीत आले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तर त्यांनी गंभीर आरोप करत शिवसेनेला अडचणीत आणले आहे. त्यावर कुरघोडी करण्यासाठी संजय राऊत यांनी विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी किरीट सोमैयांनी जनतेकडून कोट्यावधी रुपये गोळा करून परस्पर त्याचा व्यवहार केल्याचा आरोप केला.