ठाणे :डोंबिवलीत राहणाऱ्या एका माजी उपसरपंचाच्या स्वप्नात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आले होते. असा त्यांनी दावा करत स्वतः सांगितले कि, मुलीचे नाव शिवसेना ठेवले आहे. विशेष म्हणजे मुलीच्या आधारकार्डवरही शिवसेना असे नाव नोंदवले आहे. एकीकडे राज्यातील सत्ता संघर्षांत ठाकरे विरुद्ध शिंदे गटात शिवसेना कोणाची ? असा न्यायालयात वाद सुरू असतानाच असा चमत्काराचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
कन्या रत्नाचा जन्म :पांडुरंग वाडकर, असे बाळासाहेब स्वप्नात आल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते मूळचे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पिपंळवाडीचे रहिवाशी आहे. विशेष म्हणजे पांडुरंग हे पिपंळवाडी ग्रामपंचायतीमध्ये २०१२ ते १३ साली शिवसेनेकडून उपसरपंच पद भूषवले आहेत. सध्या रोजीरोटीच्या शोधात गेल्या काही वर्षांपासून डोंबिवलीतील शेलार नाका भागात असलेल्या एका चाळीच्या खोलीत कुटूंबासह राहतात. त्यातच १७ ऑक्टोंबर २०२२ रोजी त्यांच्या पत्नीला कन्यारत्न जन्माला आली. मात्र मुलगी जन्माला येण्याआधीच पांडुरंग यांच्या स्वप्नात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आल्याचा दावा केला. सध्याच्या शिवसेना पक्षातील घडत असलेल्या घडामोडीवर बाळासाहेब आणि माझ्यात बोलणेही झाले. त्यावेळी जे काही राजकारण सुरू आहे. ते मला योग्य वाटत नाही. तू काळजी करू नकोस, शिवसेना तुझ्या घरी येणार अशी आमच्या दोघात चर्चा झाल्याचा दावा पांडुरंग यांनी केला.