ठाणे - कोरोनाने आज संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. दरदिवशी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, ही एक अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. परंतु, यात आनंदाची बाब म्हणजे या सर्व रुग्णांना सुविधा देण्यासाठी राज्यातील सर्व मेडिकल स्टाफ अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्राने देखील या सर्व मेडिकल स्टाफचे पगार दुप्पट करावेत, अशा मागणीचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
'हरियाणा प्रमाणे मेडिकल स्टाफचा पगार दुप्पट करा, पोलिसांना 50 लाखाचे विमाकवच द्या' - मेडीकल स्टाफचा पगार दुप्पट करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णांना सुविधा देण्यासाठी राज्यातील सर्व मेडिकल स्टाफ अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्राने देखील या सर्व मेडिकल स्टाफचे पगार दुप्पट करावेत, अशा मागणीचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय यासह अनेकांनी आपले प्राण धोक्यात घालत रुग्ण सेवा देत आहेत. तरी, हरियाणा च्या धर्तीवर महाराष्ट्राने देखील या सर्व मेडिकल स्टाफचे पगार दुप्पट करावेत अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मेडिकल स्टाफ सोबतच आज दिवसरात्र, उन्हातान्हात उभे असणाऱ्या पोलिसांचे वेतन पण वेळेवर मिळावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. पोलीस बांधव देखील कायम संकटांच्या छायेत आपली ड्युटी करत असतात. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या असताना त्यांना कोणासमोर हाथ पसरायला लागू नये म्हणून सर्व पोलीस बांधवांना 50 लख रुपयांचे कवच द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.